लोकमत न्यूज नेटवर्कपिपरी : गेल्या तीन महिन्यांत शहरातील अवैध बांधकामावरील दंडात्मक कारवाईद्वारे पिंपरी-चिंचवड महापालिकेला तब्बल १२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत उत्पन्नात ९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. महापालिका सह आयुक्त दिलीप गावडे यांनी याबाबत माहिती दिली. राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड शहरातील ६०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांचा शास्तीकर माफ केला आहे. याचा लाभ अवैध बांधकाम धारकांनी घेतला असल्याचे दिसून येत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जुलै या पहिल्या तीन महिन्यांत अवैध बांधकामावरील दंडात्मक कारवाईतून १२ कोटी १ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत या उत्पन्नात ९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. २०१५-१६ मध्ये तीमाहीत ३ कोटी १२ लाख रुपयांचे आणि २०१६ - १७ मध्ये २ कोटी ८२ लाख रुपयांचे उत्पन्न अवैध बांधकामावरील कारवाईतून मिळाले.शंभर टक्के माफी हवीमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ६०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांचा शास्तीकर माफ केला आहे. परंतु, १०० टक्के शास्तीकर माफ करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यात ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अवैध घरे दंड भरून नियमित करण्याचे नवे विधेयक राज्य सरकारने संमत केले आहे.
दंडात्मक कारवाईतून १२ कोटींचे उत्पन्न
By admin | Published: July 05, 2017 3:21 AM