पिंपरी : उलट्या दिशेने वाहन चालविणाºयांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. भारतीय दंडसंहिता कलम २७९ चा आधार घेऊन अशा वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. उलट दिशेने वाहन चालविणाºया वाहनचालकांवर चौकाचौकांत, तसेच अंतर्गत रस्त्यांवर कारवाई सुरू आहे. पोलीस आयुक्तालय परिमंडल एकच्या हद्दीत २९ वाहनचालकांवर, तर परिमंडल दोनच्या हद्दीत ३२ वाहनचालकांवर अशी एकूण ६१ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून विरुद्ध दिशेने वाहन चालवून अपघाताला आमंत्रण देणारे, स्वत:सह दुसºयाच्या जिवाला धोका निर्माण करणारे वाहनचालक शहरात ठिकठिकाणी दिसून येतात. वेळोवेळी सूचना दिल्या, जनजागृती केली. परंतु उलट दिशेने वाहन चालविणाºया बेशिस्त वाहनचालकांच्या वर्तणुकीवर काही फरक दिसून आलेला नाही. बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. परिमंडल एकच्या हद्दीत पिंपरीत ६, निगडीत १, भोसरीत २ आणि चाकण येथे २० अशा एकूण २९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. परिमंडल दोनच्या हद्दीत देहूरोडमध्ये ३, किवळेत ३, चिखलीत ३, तळेगाव दाभाडे येथे ५, वाकडला १८ अशा एकूण ३२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी कारवाईची तीव्र मोहीम राबविण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. तसेच पोलिसांकरिता त्यांनी बक्षीस योजनासुद्धा जाहीर केली आहे. विरुद्ध दिशेने दुचाकी चालविणाºयास पकडल्यानंतर १०० रुपये, चारचाकी मोटारचालकास पकडल्यास ५०० रुपये अशी बक्षीस योजना आहे. योजना जाहीर केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलीस आणखी कार्यतत्पर झाले आहेत. प्रमुख रस्त्यांवर तसेच वर्दळीच्या ठिकाणच्या रस्त्यांवर उलट दिशेने येणाºयांना पकडून कारवाई करण्यास पोलीस सज्ज झाले आहेत. रोज प्रमुख चौकांमध्ये सुमारे ५० चालकांवर कारवाई केली जात आहे.