लोणावळा : वाहतूक नियमांचा भंग करत बेदरकारपणे वाहन चालविणे, विनालायसन्स वाहन चालविणे, फॅन्सी नंबर प्लेट, विनाहेल्मेट गाडी चालविणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणे आदी प्रकारे नियमांचा भंग करणाऱ्यांवर आता शासन अधिसूचना क्रमांक एमव्हीआर ०७१६/प्रक.३४२/परि २ अंतर्गत तडजोड शुल्कात वाढ करण्यात आली आहे. १७ जानेवारी २०१७ पासून पुणे ग्रामीण वाहतूक विभागाकडून या नवीन अधिसूचनेनुसार दंड आकारणी सुरू करण्यात आली आहे.नवीन नियमांनुसार विनाहेल्मेट वाहन चालविणे, अधिकाऱ्यांचे आदेश न मानणे, लायसन्स नसलेल्या व्यक्तीला वाहन चालविण्यास देणे, विनालायसन्स वाहन चालविणे याकरिता प्रत्येकी ५०० रुपये दंड, चुकीची नंबरप्लेट, गाडीला रिफ्लेक्टर व टेल लॅम्प नसणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणे, धोकादायकरीत्या वाहन चालविणे याकरिता १००० रुपये दंड, अपात्र असताना लायसन्स मिळविणे २०० रुपये व नियमभंग करत अतिवेगाने वाहन चालविण्यासाठी २००० रुपये दंडाची आकारणी करण्यात येणार आहे.(वार्ताहर)
दोषी चालकांवर दंडआकारणी
By admin | Published: January 23, 2017 2:49 AM