शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
3
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
4
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
7
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
8
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
9
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
10
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
11
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
12
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
13
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
14
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
15
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
16
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
17
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
18
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
19
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
20
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा

दंड माफी योजना गाजर, सत्ताधिकारी भाजपवर निशाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 2:35 AM

मिळकतकर : शास्तीकर सवलतीची होईना अंमलबजावणी

पिंपरी : अवैध बांधकाम शास्तीचे गाजर सत्ताधारी भाजपाने दाखविले. आता प्रशासनाने थकबाकीसह मिळकतकर भरल्यास दंडात सवलत देण्यात येणार आहे. विविध कारणांमुळे नागरिक मिळकतकर भरत नाहीत. अशा थकबाकीदावर सहामाही व नऊमाहीनंतर प्रत्येक महिन्यास सदर बिलाच्या रकमेवर दोन टक्के दराने दंड आकारला जातो. या दंडामध्ये सवलत देण्याची अभय योजना पालिकेने जाहीर केली आहे. मिळकतकर दंड माफी ही योजना गाजर ठरू नये, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे मिळकतकराची वसुली केली जाते. पालिकेतर्फे सोळा विभागीय कार्यालयामार्फत मिळकतकर जमा केला जातो. गेल्या काही वर्षांत थकीत मिळकतकरावर सहामाही आणि नऊमाहीनंतर प्रत्येक महिन्यास बिलाच्या रकमेवर प्रतिमहिना दोन टक्के दराने दंड आकारला जातो. वर्षानुवर्षे मालमत्ता बंद असल्याने, मालक व भाडेकरू, तसेच, कौटुंबिक वादामुळे, न्यायालयीन प्रकरण, रस्ता रुंदीकरणामध्ये पूर्ण किंवा काही प्रमाणात पाडलेली मालमत्ता आणि आर्थिक परिस्थिती आदी कारणांमुळे मिळकतकर भरण्यास काही नागरिकांचा कल दिसत नाही. परिणामी, दिवसेंदिवस मिळकतकर थकबाकीत वाढ होत आहे.

महापालिकेत नाही आला शासनादेशसत्ताधारी भाजपाने शास्तीकर माफी झाल्यामुळे पेढे वाटले होते. तसेच शहरात फ्लेक्सही लावले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. थकीत मिळकतकर वसूल व्हावा म्हणून पालिकेने या दोन टक्के दंडाच्या रकमेत सवलत देण्याची योजना जाहीर केली आहे. थकबाकीसह संपूर्ण मिळकतकर पंधरा आॅक्टोबर या कालावधीत भरणाऱ्या नागरिकांना दंडामध्ये नव्वद टक्के सूट दिली जाणार आहे. तर आॅक्टोबरअखेरपर्यंत थकबाकीसह संपूर्ण मिळकतकर भरणाºया नागरिकांना दंडात ७५ टक्के सवलत दिली जाणार आहे. नागरिकांनी या सवलत योजनेचा लाभ घेऊन थकबाकीसह संपूर्ण मिळकतकर भरावा. या अभय योजनेच्या प्रसिद्धीसाठी कर संकलन विभागातर्फे जनजागृती मोहीम होती घेण्यात येणार आहे. मिळकतकर विभागाने जाहीर केलेली योजना ही नियमित अधिकृत बांधकामांचा कर भरणाºयांसाठी आहे. अवैध बांधकाम शास्ती इमारतींना ही सवलत लागू नाही. याबाबत नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.सत्ताधाºयांनी फसवणूक थांबवावी४भारतीय जनता पक्षाची सत्ता राज्यात आणि महापालिकेत आल्यापासून अवैध बांधकाम शास्तीबाबत अनेकदा निर्णय झाले, असे जाहीर करण्यात आले. मात्र, अंमलबजावणी झालेली नाही. शास्तीकरात शंभर टक्के माफी मिळावी, करमाफी योजना गाजर ठरू नये असे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपा