पिंपरी : नागरिकांना तातडीने मदत मिळण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘रिस्पॉन्स टीम’ची स्थापना केली आहे. मात्र, या टीमकडून काही वेळेस ‘स्लो रिस्पॉन्स’ मिळत असल्याने नागरिकांना वेळेत मदत मिळत नाही. दरम्यान, अशाप्रकारे ‘स्लो रिस्पॉन्स’ देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना मंगळवारी जादा कवायतीची शिक्षा देण्यात आली.पिंपरी-चिंचवड शहरासाठी १५ आॅगस्ट २०१८ पासून स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू झाले. शहरात कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आयुक्तांनी विविध उपाययोजना राबविल्या. तातडीच्या मदतीसाठी एखाद्या नागरिकाने नियंत्रण कक्षात फोन केल्यास त्यास मदत मिळावी, यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात दिवस-रात्री सहा ते सात ‘रिस्पॉन्स टीम’ कार्यरत असतात. या टीममध्ये सात ते आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असून, ठाण्यांतर्गत असलेल्या चौकीनिहाय या टीम काम करतात. तसेच काही टीम पोलीस ठाण्यातही असतात. कॉलची माहिती मिळाल्यानंतर ही टीम तातडीने घटनास्थळी पोहोचून संबंधित व्यक्तीला मदत मिळणे अपेक्षित आहे. मात्र, काही नागरिकांनी नियंत्रण कक्षाला मदतीसाठी फोन केल्यानंतरही त्यांना वेळेत मदत मिळाली नाही. यामुळे या ‘रिस्पॉन्स टीम’ ढिम्म असल्याचे दिसून आले.रिस्पॉन्स टीम : ढिम्मपणाची दखलआयुक्तांनी मागील काही दिवसांतील ‘रिस्पॉन्स टीम’च्या कामकाजाचा आढावा घेतला. नियंत्रण कक्षाला फोन किती वाजता आला, टीम किती वाजता घटनास्थळी पोहोचली, किती वेळेत पोहोचणे अपेक्षित होते, किती उशीर झाला आदी बाबींची माहिती घेतली.तसेच ‘स्लो रिस्पॉन्स’साठी जबाबदार असणाºया पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांना मंगळवारी चिंचवड येथील आयुक्तालयात बोलावून घेत ज्यादा कवायतीची शिक्षा केली. आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाºयांनीहीयास दुजोरा दिला. मंगळवारी दुपारी आयुक्तालयाच्या आवारात बराच वेळकवायत सुरू होती.
कामचुकार पोलिसांना कवायतीची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 2:51 AM