सांगवी : आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडून १० लाख ८० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, ठेकेदाराकडून अनेक कामे जाणूनबुजून प्रलंबित ठेवली जात आहेत. अंदाजपत्रकानुसार कामे झालीच नसल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. हे सर्व कामकाज नियोजनशून्य करण्यात आले आहे.
आरोग्य केंद्रातील कर्मचारीवर्गासाठी राहण्यासाठी असलेल्या वसाहती व आरोग्य केंद्रास निकृष्ट दर्जाचा रंग दिला आहे. शेडची लांबी रुंदी कमी असून, डागडुगीत लाईट फिटिंग, खिडक्यांच्या तुटलेल्या काचा, बाथरूमचे जुने दरवाजे काढून नवीन बसवणे, सेफ्टी डोअर अशी महत्त्वाची कामे अद्याप झाली नाहीत. आरोग्य केंद्राच्या पाठीमागील बाजूस अंदाज न घेताच रस्त्यावर पेव्हर ब्लॉकचे कामकाज करून या अपुºया रस्त्यामुळे रुग्णवाहीकेसाठी उभारलेल्या शेडमध्ये जाण्यासाठी जागाच उपलब्ध होत नाही. यामुळे रुग्णवाहीका सुरक्षीतेसाठी शेडमध्ये पार्किंग करण्याऐवजी बाहेरच्या बाजूला पार्किंग करावी लागत आहे. यामुळे झालेल्या कामाचा पैसा पाण्यात गेल्याचे समोर येत आहे.
कर्मचाऱ्यारी वसाहतीच्या समोरच्या मोकळ्या जागेत मध्यभागी असलेला भाग सिमेंट कॉंक्रिटीकरण किंवा पेव्हर ब्लॉकने भरून घेण्याऐवजी अर्धवट अवस्थेत ठेवला आहे. यामुळे पावसाळ्यात पाणी बाहेर जाण्यासाठी जागाच राहिली नाही. बारामती पंचायत समितीच्या अधिकाºयांकडून याकडे दुर्लक्ष करीत आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी पंचायत समितीचा एकही अधिकारी आला नाही. यामुळे आलेल्या निधीचा परीपत्रकानुसार कामे होऊन पुरेपूर वापर झाला आहे का? याची चौकशी होणे गरजेचे आहे.सांगवी आरोग्य केंद्रातील झालेल्या कामाबाबत बांधकाम विभागाचे अधिकारी यांना बरोबर घेऊन झालेल्या संबंधित कामाची लवकरच पाहणी करणार आहे. याबाबत चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.- प्रमोद काळे, गटविकास अधिकारी, बारामती पंचायत समिती