पाईट : कोये (ता. खेड) येथे खडी क्रशरमुळे गावास नळ-पाणीपुरवठ्याची विहीर असणाऱ्या पाझर तलावास धोका निर्माण झाला असून, खडी क्रशरमुळे येथील नळ-पाणीपुरवठा योजना धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथील नळ पाणीपुरवठ्याची विहीर असणाºया पाझर तलावाच्या अगदी लगत खडी क्रशरसाठी लागणारी दगडखाण बेकायदेशीररीत्या खोदकाम सुरू आहे. या खोदकामामुळे पाझर तलावास धोका निर्माण झाला आहे. दगडखाणीचे उत्खनन हे पाझर तलावाच्या सांडव्याजवळून झाले आहे.
पावसाळ्यामध्ये तर सांडव्याचे पाणी दगडखाणीतच पडत आहे. पाझर तलावाच्या भिंतीजवळ दगड खाण करताना मोकळी जागा सोडावयास पाहिजे होती. परंतु ती खाणमालकाने कोणतीही खबरदारी न घेताच बेकायदा काम होत आहे. तसेच उत्खननासाठी वापरण्यात येणाºया स्फोटकामुळे तलावाच्या भिंतीस धोका निर्माण होण्याचा धोका असून तलावालगतची दगडखाण तलावालगत बेसुमारपणे खोल खोदली आहे. यामुळे भविष्यात तलावातील पाणी निघून जाण्याचा धोका वाढण्याचा संभव निर्माण झाला असून या दगडखाणीची तक्रार ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे केली आहे. तसेच परिसरातील विहिरी व बोअरवेलचे पाणी जाण्याच्या घटना होत आहेत. पाणी दूषित होत असून त्याबाबत त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.शेतकºयांचे होत आहे मोठे नुकसानकोये गावच्या पश्चिमेला असलेल्या पाझर तलावामुळे अनेक शेतकºयांना उपयोग होत आहे. तसेच नियमित पाणी असल्याने गावची तहान भागविली जात आहे. तलावास धोका झाल्यास अनेक शेतकºयांचे नुकसान होणार असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. येथील ग्रामपंचायत सदस्य कुंडलिक राळे यांनी खडी क्रशरमुळे गावास नळ पाणीपुरवठ्याची सुविधा असलेल्या पाझर तलावास धोका निर्माण झाला असून तलावाच्या सांडव्यातच क्रशरचे खाणकाम सुरू आहे. खाणकामासाठी वापरण्यात येणाºया स्फोटकामुळे तलावच धोक्यात आला आहे. खडी क्रशरचे संपूर्ण कामच संशयास्पद असून याबाबत चौकशी होणे गरजेचे आहे.