मोशी : जमिनीच्या व्यवहारातून आलेले पैसे व्यवसायाला लावून व्यवसायवृद्धी वाढवने किंवा योग्य गुंतवणूक करणे आता नामशेष होत असून, झटपट पैसे कमाविण्याच्या नादात आलेले पैसे दहा ते तीस टक्के व्याजदराने कर्जाऊ देऊन त्या व्याजाच्या पैशांवर गुजरान करण्याचा नवीन व्यवसायच पुढे आला आहे. सध्या शहरात अशाप्रकारच्या अवैद्य सावकारीला पाय फुटले असून, तक्रारच दाखल होत नसल्याने यावर प्रतिबंध घालण्यास पोलिसांनाही अपयश येत आहे.कर्ज वीस हजारांचे व्याज वषार्ला नव्हे महिन्याला दहा टक्के. व्याजाच्या मोबदल्यात आतापर्यंत सहा लाख दिले तरीसुद्धा अजून कर्ज कायमच. असल्या कधीही न फिटणाºया सावकारीच्या जाळ्यात उद्योगनगरीतील अनेक जण सापडले आहेत. लाखो रुपयांचे भांडवल, सोबत दहशत आणि पिळून पिळून कर्ज व व्याज वसुलीची निर्दयता केवळ याच्या बळावर ही सावकारी चालू आहे.वेळेला गरज म्हणून एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडूनही पैसे घेतल्यास त्यानेही केलेल्या व्याजाच्या भडीमारात आज प्रत्येक जन अडकलेला दिसतो. कमी वेळेत जास्त नफा मिळवून देणारा व्यवसाय म्हणून आज सामान्य नागरिकही या व्यवसायाकडे पाहत आहे.सरकारी बँकांचा कर्जासाठी असलेला नियमांचा भडीमार पतसंस्था, फायनान्सचा अमर्यादित कर्ज वाटपाचा घोळ यासाºयांपेक्षा खासगी व्यक्तीकडून विनातारण काही टक्क्यांवर गरजेला पैसे मिळवणे त्याला अधिक सरळ वाटत आहे.पिंपरी-चिंचवड शहर आणि उपनगरात सध्या अशी स्थिती आहे, की काही कामधंदा नाही; पण दादागिरी करायची तयारी आहे. त्यांचा सावकारी हा धंदा झाला आहे. कारण दहा टक्के व्याजाने सावकारी करण्यासाठी दोन-तीन टक्के व्याजाने पाहिजे तेवढा पैसा सावकारांना पुरवणारी नवी यंत्रणा उभी राहिली आहे. स्वत: फारशी रिस्क न घेता महिन्याला दोन-चार लाख रुपये मिळत असल्याने काही तथाकथित नेते, व्यापारी, बँका, पतसंस्थांचे बदनाम संचालक यांनी हा पैसा पुरवण्याचा धंदा सुरू केला आहे. त्यामुळे चार-पाच जणांच्या टोळक्याला एकत्र येऊन सावकारीचा धंदा करण्यासाठी भांडवल मिळू लागले आहे. कामधंदा नाही; पण दादागिरी करून व्याज, मुद्दल वसूल करण्याची ताकद आहे, अशांनी सावकारी सुरू केली आहे. ‘व्याजाने पैसे फिरवणेह्ण हा उघड उघड धंदा त्यांनी मांडला आहे.- लाखाचे बारा हजार नव्हे, तर बघता बघता लाखाचे बारा लाख करण्याचा हा धंदा असल्याने अनेक नवे सावकार पिंपरी - चिंचवड शहरात तयार झाले आहेत. कागदोपत्री संरक्षण असावे, म्हणून त्यातील काहींनी सावकारीचे लायसन्स घेतले आहे़ पण लायसन्सचा व्यवहार वेगळा आणि दोन नंबरचा व्यवहार वेगळा, अशी त्यांची सावकारीची पद्धत होऊ लागली आहे.- सावकारीच्या या फासात सापडलेल्यांना सहज बाहेर काढणे शक्य नाही, ही वस्तुस्थिती आहे. सावकारी केली तर आपली धडगत नाही, असे वातावरण तयार करणे या क्षणी तरी पोलिसांना शक्य आहे. पोलिसांनी नुकत्याच एका प्रकरणात काहींना ताब्यात घेतले आहेच. परंतु, ही कारवाई तीव्र करण्याची गरज आहे.- अवैध व्यावसायिक संबंधितांकडून कायदेशीररीत्या स्वत: सुरक्षित राहतील, असे प्रतिज्ञापत्र बनवून घेतात किंवा स्वबळावर ग्राहकाची वस्तू गहाण घेऊन शासकीय नियम ढाब्यावर ठेवतात व व्याज आकारणी करतात. कायद्याची अंमलबजावणी करणाºयांना मात्र तक्रार आल्याशिवाय काहीही करता येत नसल्याने व्याजाच्या चक्रव्यूहात अडकलेला ग्राहक मात्र दिवसेंदिवस होरपळला जात आहे.- संबंधितांची गरज पाहून त्याच्याकडून व्याज आकारणी केली जाते़ त्यात किमान दोन, तीन, पाच ते दहा टक्क्यांपर्यंत मासिक व्याज आकारले जाते. बेरोजगार तरुण, मजूर, शेतकरी, लहान व्यावसायिक, तर काही नोकरदारांचाही त्यात समावेश आहे. पैशांची अडचण असणाºया व्यक्तीस सुरुवातीला कर्ज घेतल्यानंतर काही दिवस व्याज देणे शक्य होते.
खासगी सावकारकीचे फुटले पेव, दरमहा दहा टक्क्याने देण्याचा नवा धंदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 4:03 AM