पिंपरी : साखरपुडा झाल्यानंतर लग्नाचे अमिष दाखवून तरुणीसोबत शारिरीक संबंध ठेवले. लग्नाच्या अमिषाने वारंवार तिच्यावर अत्याचार केला. मात्र, तरुणीने लग्नाविषयी विचारणा केली असता लग्न केले नाही. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण केली. ही घटना जून २०२० ते १३ मे २०२३ या कालवाधीत दिघी परिसरात घडली. या प्रकरणी तरुणीने दिघी पोलिस ठाण्यात सोमवारी (दि.२९) दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी लग्नाच्या अमिष दाखवणाऱ्या २८ वर्षीय तरुणासह त्याची आई, भाऊ यांच्यासह दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय आरोपीचा पाच एप्रिल २०२० मध्ये फिर्यादीसोबत साखपुडा झाला होता. त्यानंतर लग्नाच्या अमिषाने आरोपीने फिर्यादीसोबत वारंवार शारिरीक संबंध ठेवले. फिर्यादीने लग्नाबाबात विचारणा केली असता तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्यासोबत गैरवर्तन केले. तर, २२ एप्रिल २०२३ ला आरोपीच्या नात्यातील एका महिलेने फिर्यादीच्या हातावर खलबत्ता मारून तिचा हात फॅक्चर केला. तसेच इतर आरोपींनी फिर्यादीला हाताने मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या आईला आणि बहिणाला देखील आरोपींकडून मारहाण करण्यात आली, असे फिर्यादीत नमूद आहे.