पिंपरी - हॉटेल व्यावसायिकाला खंडणी मागितल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील तीन आरोपींना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार मागील सहा महिन्यांपासून सुरू असून, आरोपींनी यापूर्वी साडेतीन लाख रुपयांची खंडणी वसूल केली आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली.विक्रम परशुराम बेखत्यारपुरी (वय २९, सायली पार्क, राहटणी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन राकेश सौदाई (वय ३२), ओंकार मेढेकर (वय २६), नदीम ताजुदीन मनेर (वय २०), संतोष कुरावत (वय ३२), सनी सौदाई (२६, सर्व रा. काळेवाडी) आणि प्रशांत या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यातील राकेश, ओंकार आणि नदीम यांना अटक केली आहे.तिघांना अटक; तिघेजण पसारविक्रम हे हॉटेल व्यावसायिक आहेत. सचिन आणि संतोष हे आरोपी सहा महिन्यांपासून विक्रम यांना वारंवार वेगवेगळ्या फोनवरून खंडणीची मागणी करीत होते. खंडणी न दिल्यास कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिल्याने घाबरून विक्रम यांनी आरोपींना वेळोवेळी ३ लाख ५० हजार रुपयांची खंडणीची रक्कम दिली आहे. ८ जूनला पुन्हा त्यांनी दोन लाख रुपयांची मागणी केली. भयभीत झालेल्या विक्रम यांनी या वेळी धाडस करून थेट पोलीस ठाणे गाठले. गंभीर दखल घेत पिंपरी पोलिसांनी तिघांना अटक केली असून अन्य तीन पसार झाले आहेत. पिंपरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजू ठुबल तपास करीत आहेत.
हॉटेलचालकाकडे खंडणी मागणारे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 2:51 AM