पिंपरी : औद्योगिक नगरी पिपरी चिंचवड शहरात शनिवार।पासून अनलॉक -३ ची अंमलबजावणी सुरू होणार आहे. शहरातील सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरु राहणार आहेत. तर, शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स दिनांक ५ ऑगस्ट पासून सुरू होणार आहेत. हॉटेल मधील निवास व्यवस्था ३० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. दुचाकीवरून डबलसीट प्रवास करता येणार आहे. याबाबतची नियमावली आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शुक्रवारी जाहिर केली आहे.
कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना राज्यात उद्यापासून अनलॉक -३ चा टप्पा सुरू होणार आहे. त्याबाबतची नियमावली महापालिकेने जारी केली आहे. रात्री आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी रात्री १०.ला नियमावली जाहीर केली, यामध्ये दुकानांची वेळ दोन तासाने वाढविण्यात आली आहे. तसेच कॅटेन्मेंट झोन मधील निर्बंध कायम राहणार आहेत................ हे सुरू राहणार१) सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरु राहणार तर बाजारपेठेतील दुकाने पी २, पी २ नुसार सुरू राहतील२) शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स ५ ऑगस्ट पासून सुरू होणार३) हॉटेल, लॉजिंग, गेस्ट हाऊस निवास व्यवस्थेसाठी ३३ टक्के क्षमतेने सुरू४) शासकीय कार्यालये १५ टक्के मनुष्यबळासह सुरू५) क्रीडा संकुले, स्टेडियम, पालिकेची मैदाने, उद्याने सकाळी ६ ते सायंकाळी ७पर्यंत खुली राहणार६) औद्योगिक आस्थापना १०० टक्के क्षमतेने सुरु७) खासगी कार्यालये, माहिती तंत्रज्ञान विषयक ५० टक्के मनुष्यबळासह सुरु, शक्य असेल तोपर्यंत वर्क फ्रॉम होम८)सरकारच्या आदेशानुसार केशकर्तनालये, ब्युटी पार्लर सुरु राहणार.....या गोष्टीना बंदी
१) शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था२) रेस्टारंट, सिनेमा हॉल, व्यायाम शाळा.३).जलतरण तलाव, बार, सभागृहे, नाट्यगृहे, मनोरंजन पार्क४) सर्व प्रकारचे सामाजिक, धार्मिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजने, सांस्कृतीक, शैक्षणिक उपक्रम, सभा, संमेलने