पिंपरी : चिंचवड येथील एम्पायर इस्टेट पुलाचा आराखडा बदलून त्या ठिकाणी रॅम्प टाकण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे एम्पायर इस्टेट सोसायटीमधील नागरिकांना समस्यांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. तो त्वरित रद्द करावा, अशी मागणी एम्पायर इस्टेट हौसिंग सोसायटीचे चेअरमन संतोष पिंगळे, सचिव संजीव शेवाळे, सुरेश व्यास यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.याबाबत बोलताना पदाधिकारी म्हणाले,‘‘एम्पायर इस्टेटमधून जो उड्डाण पूल तयार करण्यात आला आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सुमारे १०० कोटींचे कर्ज जागतिक बँकेकडून घेतले आहे. त्या वेळी जो करार जागतिक बँकेने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेबरोबर केला आहे त्यात मोठा पूल सदर सोसायटीतून जात असल्याने एम्पायर रहिवाशांना अडचण होणार नाही. रहिवाशांच्या सूचना विचारात घेण्यात याव्यात, अशी अट करारनाम्यात आहे. तथापि सातत्याने २०१० पासून महापालिकेला पुलाबाबत उपलब्ध होणाºया अडचणी सांगत आहोत. परंतु, महापालिका त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करीत आहे. एम्पायरमधून महापालिकेला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा कर दिला जातो. केवळ काही अधिकाºयांच्या हट्टाने सदर पुलाला जोडून एम्पायरमध्ये चढ व उतार पूल करावयाचे महापालिकेने निश्चित केले आहे. केवळ ५.५ मीटरच्या रस्त्याचे नियोजन पुलाच्या दोन्ही बाजूलाकेलेले आहे.त्यामुळे एम्पायरमध्ये रोज येण्या जाण्यासाठी रस्ता अपूर्ण आहे. रॅम्प उभारल्याने सोसायटीतील नागरिकांची गैरसोय होणार आहे. येथे रॅम्प उभारू नयेत.’’ याबाबत आयुक्तांनाही निवेदन दिले आहे.महापालिकेने ले-आऊट केला चुकीचा?ले आऊटप्रमाणे २ नं. चा उतार पूल डी-मार्टजवळ उतरत असल्याने पुन्हा नं. १ उतार पूल ३०० फूट मागे एम्पायरमध्ये उतरविणे उचित होणार नाही. त्यामुळे एम्पायरमधील नं. १ उतार पूल रद्द केल्यास काळेवाडीकडून येणारे नागरिक नं. २ च्या उतारपुलाने डी-मार्टजवळ उतरून पुण्याच्या दिशेने जावयाचे असल्यास डी-मार्ट समोरून पुण्याकडे जाऊ शकतात. शिवाय चिंचवड चौकात निरामय हॉस्पिटल समोरून चिंचवड चौकात येऊ शकतात वा निगडीकडे प्रस्थान करू शकतात.भविष्यात बीआरटी सुरू झाल्यावर चिंचवड चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होणार आहे. त्यात एम्पायरमधील उतार पूल नं. १ रद्द न केल्यास काळेवाडीकडून येणाºया वाहनांमुळे त्यात आणखीनच भर पडणार आहे. फिनोलेक्स चौक ते एम्पायर यामध्ये रहिवासी नाहीत व मासूळकर कॉलनी, संत तुकारामनगर, नेहरुनगर, भोसरी, एमआयडीसी येथून येणारे नागरिक मोरवाडी कोर्ट चौकातून आॅटोक्लस्टरसमोर चालू होणाºया उड्डाणपुलावर जाऊ शकतात. चढ पूल क्र. ३ ची आवश्यकता नसल्याने रद्द करण्यात यावा.एम्पायरमधील फेज १ व फेज २ मधील इमारती ६ मजल्याच्या आहेत. तर फेज ३ मधील इमारती ११ मजल्याच्या आहेत. व इतक्या मजल्याच्या इमारती केवळ एम्पायरमधील रस्ता ४५ मीटर रुंद असल्याने महापालिकेने नियमानुसार मंजूर केलेल्या आहेत. मुळात एम्पायर इस्टेट या २७ एकराच्या प्रोजेक्टचा ले आऊट महापालिकेनेच मंजूर केलेला आहे़व एम्पायर इस्टेटमधील सर्व १२ गेटस या ४५ मीटर रुंदीच्या रोडवर आहेत. तसेच पुढे जाण्यासाठी कोणताही रस्ता नाही, असे आक्षेप सोसायटीतील पदाधिकाºयांनी घेतले.
पिंपरी : एम्पायर पुलाचा आराखडा बदलून रॅम्पचा घाट; सोसायटीची होणार गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 6:15 AM