शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

पिंपरी- चिंचवड भाजपला चौथा आमदार! गटा-तटाला थारा न देता अमित गोरखे यांना संधी

By विश्वास मोरे | Published: July 01, 2024 5:08 PM

''महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कोणत्याही पक्षाने विधानपरिषद किंवा राज्यसभेवर संधी दिली नाही. भाजपने प्रथमच मातंग समाजाला प्रतिनिधींत्व दिले''

पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहरात भाजपात भोसरी विरुद्ध चिंचवड युद्ध, कुरघोडण्याचे राजकारण सुरु असते. त्यामुळे पिंपरी विधानसभेतील नेत्यांवर अन्याय होत आहे. भाजपातील स्थनिक पातळीवरील गटा-तटास फाटा देऊन भाजपचे सचिव अमित गोरखे यांना संधी दिली आहे.  पिंपरी- चिंचवड शहर परिसरामध्ये पिंपरी, चिंचवड आणि भोसरी असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. चिंचवडमधून भाजपचे अश्विनी जगताप, भोसरीमधून महेश लांडगे तर विधान परिषदेतून उमा खापरे यांना संधी मिळाली आहे. 

महापालिकेची सूत्र आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्याकडे आल्यानंतर पिंपरी विधानसभेतील नेतृत्वाला संधी मिळत नव्हती, तशी मागणी आणि तक्रारी केल्या जात होत्या. दोन नेत्यांच्या गटातटाच्या फटका पिंपरीला बसत होता. त्यावेळी सन २०१८ मध्ये स्थानिक नेत्यांना डावलून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहित्यरत्न  लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी गोरखे यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर २०१९  मध्ये राज्यात सत्तांतर झाले. त्यामुळे सर्व मंडळे बरखास्त झाली. सन २०२२ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार जाऊन महायुतीचे सरकार आले. त्यानंतर माजी विरोधी पक्षनेत्या उमा खापरे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. त्यानंतर विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपने पिंपरीतून अमित गोरखे यांना संधी दिली आहे. 

अमित गोरखे यांची वाटचाल ! 

अमित गोरखे यांनी राजकारण, समाजकारण,  शिक्षण,  कला अशा विविध क्षेत्रांमध्ये इतका सर्वसामान्य कुटुंब तरुणांनी भरारी घेतली आहे. गोरखे हे पिंपरी- चिंचवडमधील रहिवासी असून, त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून समाजशास्त्र विभागातून एमए, ह्युमन रिसर्चमधून एमबीए पूर्ण केले आहे. त्याचबरोबर सध्या भाजपचे राज्यसचिव म्हणून काम करत आहेत. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष,  नोव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष, कलारंग सांस्कृतिक कला संस्थेचे अध्यक्ष, नाम फाउंडेशनचे समन्वयक अशी विविध पदे भूषवलेले आहेत. त्याचबरोबर २०११ मध्ये जाहीर केलेल्या नॅशनल युथ अवार्डचे ते मानकरी आहेत. शिक्षण रत्न पुरस्कार, महाराष्ट्र राज्य युवा धोरण ठरवण्यासाठी सदस्य, महाराष्ट्र शासन युवा संचालनाचा पुरस्कार मिळालेला आहे. 

अमित गोरखे म्हणाले, 'भाजपने मला विधान परिषदेची उमेदवारी दिली. त्याबद्दल धन्यवाद.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील या नेत्यांमुळे वंचित दलित समाजाला न्याय देण्यासाठी मला संधी दिली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कोणत्याही पक्षाने विधानपरिषद किंवा राज्यसभेवर संधी दिली नाही. भाजपने प्रथमच मातंग समाजाला प्रतिनिधींत्व दिले आहे. निश्चितच या संधीचे मी सोने करेल.

टॅग्स :PuneपुणेVidhan Parishadविधान परिषदMLAआमदारBJPभाजपाPoliticsराजकारण