पिंपरी : शहरातील नदीकाठावर अवैध दारूच्या हातभट्टीचे कारखाने पाच ठिकाणी सुरू आहेत. शिवाय घातक रसायनाचा उपयोग करून मद्य बनवले जात आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १०८ अवैध हातभट्टीचे दारू व २६ ताडी विक्रेते आहेत. त्यामुळे स्मार्ट शहर अशी ओळख असलेली उद्योगनगरी ‘मद्य’नगरी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. सध्या उद्योगनगरीतील मोशी, चिखली, चऱ्होली, तळवडे व तळेगाव येथे नदीकाठाच्या भागात हातभट्टीची दारू बनविण्याचे कारखाने सुरू आहेत. या कारखान्यातून धोकादायक रसायनाचा वापर करून हातभट्टीची दारू बनविली जाते. पिंपरी-चिंचवड शहर व चाकण परिसरातील होलसेल विक्रेत्यांना ही घातक दारू भरलेले कॅन घेऊन रोज १० ते १२ छोट्या टेम्पोने पुरवठा केला जातो. हे सर्व अवैध धंदे राजरोसपणे सुरू असतानाही उत्पादन शुल्क विभागाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. या बेकायदा उद्योगामुळे राज्य शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडत आहे. हातभट्टीची दारू बनविण्यासाठी पूर्वी नवसागर, गूळ व हिरडा वापरला जात असे. आता हिरडा सहज उपलब्ध होत नाही. त्यामुळे हातभट्टीची दारू बनविण्यासाठी रसायनांचा वापर सुरू करण्यात आला आहे. साखर कारखान्यातून तयार होणारे स्पिरिट केमिकल कंपन्यांना विकले जाते. या कंपन्यांच्या ठेकेदारांकडून हे स्पिरिट हातभट्टीवाले विकत घेतात. या स्पिरिटमध्ये पाणी टाकून हातभट्टीची घातक दारू तयार केली जात आहे. त्यासाठी नदीतील प्रदूषित पाण्याचा वापर केला जातो. स्पिरिटपासून तयार केलेली दारू पिऊन मुंबईत ७० जणांचा मृत्यू झाला होता. राज्य उत्पादन शुल्क विभाग या घटनेची पुनरावृत्ती होण्याची वाट न पाहता तातडीने कारवाईची आवश्यकता आहे......ठिकाण हातभट्टी ताडी विक्रेता आनंदनगर ४ १यशवंतनगर २ १वेताळनगर २ १बिजलीनगर २ १नेहरूनगर ४ २खराळवाडी २ -कासारवाडी २ -डिलक्स चौक ४ २गांधीनगर पूल ३ -वल्लभनगर ३ -थेरगाव ३ १वाकड गावठाण २ -रहाटणी ३ १पिंपळे सौदागर २ १आकुर्डी विद्यानगर ४ -अजंठानगर २ -दापोडी २ १भोसरी भागात १० २मोशी परिसर ४ २चिखली हारगुडेवस्ती ५ १तळवडे ३ -देहूरोड ३ १देहूफाटा २ १चाकण १० २निगडी गावठाण व ओटा स्कीम २५ ५..........ताडी बनविताना विषारी पावडर झाडापासून मिळणाºया ताडीची विक्री करण्यासाठी परवाना आवश्यक असतो. मात्र, अवैध विक्रते गुंगी येणाºया विषारी पावडरचा उपयोग करून बोगस ताडी बनवित आहेत. हा प्रकार ताडी पिणाºयांसाठी घातक आहे. शिवाय शासनाचा महसूल बुडत असताना उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी काय करतात, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
.....................काही दिवसांपूर्वी दमण व गोवा येथील दारू आणून रिकाम्या बाटल्यांमध्ये भरून मशीनद्वारे रिफिल करण्याचा प्रकार दिघी येथील मॅग्झीन चौकातील एका वर्कशॉपमध्ये समोर आला होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करून मशीनरीसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतरही परराज्यांतून कमी भावाने दारू आणून अवैध विक्रीचा प्रकार अजूनही शहरात सुरू आहे...................