पिंपरी: राज्यात सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने १५ एप्रिल पासून संचारबंदी करण्यात आली आहे. तसेच कडक निर्बंध लावल्यात आले आहेत. संचारबंदीत पिंपरीत कोरोना रुग्णसंख्या वाढली. तरी त्या तुलनेत कोरोनमुक्तांचे प्रमाण समाधानकारक असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र मृत्यू होणाऱ्यांमध्ये अजिबात घट झाली नाही. अशा परिस्थितीत नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
शहरात कडक निर्बंधापूर्वी म्हणजे ३१ मार्च ते १४ एप्रिल या काळात ३५ हजार ४६९ कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर १ लाख १६ हजार ९२१ टेस्ट करण्यात आल्या आहेत. या कालावधीत २९ हजार ७१६ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर संचारबंदी नंतर म्हणजे १५ एप्रिल ते १ मे या काळात शहरात ३९ हजार १३९ रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४० हजार ३०८ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. या काळात रोज होणाऱ्या टेस्टचे प्रमाण वाढवण्यात आले. एकूण १ लाख ६८ हजार ३०८ टेस्ट या काळात करण्यात आल्या आहेत. या आकडेवारी वरून संचारबंदी नंतर शहरात रुग्णख्येचा आकडा हा चार हजारांनी वाढला असला तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. ही समाधानाची बाब आहे. तसेच संचार बंदी नंतर रोज सरासरी अकरा हजार टेस्ट होत आहेत.
शहरात ४ एप्रिल नंतर दैनंदिन रुग्ण संख्येने तीन हजारांचा आकडा पार केलेला नाही. तसेच मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्या ही स्थिरावली आहे. तसेच बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. सद्यस्थितीत शहरात बरे होणाऱ्या प्रमाण हे ८७ टक्के आहे. तर पॉझिटिव्हिटी दर हा २२ टक्के आहे. हा मार्च मध्ये ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत गेला होता. परंतु एप्रिल मध्ये मृत्युचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. ३१ मार्च ते १४ एप्रिल
रुग्ण : ३५ हजार ४६९टेस्ट : १ लाख १६ हजार ९२१बरे झालेले : २९ हजार ७१६पॉझिटिव्हिटी रेट : ३५ टक्के बरे होण्याचे प्रमाण : ८५ टक्के
१५ एप्रिल ते १ मे
रुग्ण : ३९ हजार १३९टेस्ट : १ लाख ६८ हजार ९३१ बरे झालेले : ४० हजार ३०८पॉझिटिव्हिटी रेट : २२ टक्के बरे होणाऱ्या प्रमाण : ८७ टक्के
४ एप्रिल नंतर नाही केला तीन हजारांचा आकडा पार
शहरात ४ एप्रिलला ३ हजार ३८२ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर शहरात अद्यातरी दैनंदिन रुग्ण संख्येच्या आकडा हा तीन हजाराच्या वर गेलेला नाही. त्यामुळे कडक निर्बंधाचा हा फायदा झाला आहे.