पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच पक्षांत घराणेशाही कायम असल्याचे दिसून येत आहे. आजी-माजी खासदार, आमदार, महापौर, उपमहापौर यांनी पत्नी, मुलगा, मुलगी, सून, चुलत भाऊ व पुतण्यास निवडणूकीच्या रिंगणात उतरविले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २१ फेबु्रवारीला होणार आहे. या निवडणुकीसाठी केलेल्या छाननीत सुमारे १३०० अर्ज पात्र ठरले आहेत. अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे स्थानिक नेते व पदाधिका-यांनी आपल्या पक्षातील उमेदवारापेक्षा आप्तस्वकीय व नातेवाईकांना बिनविरोध करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.
स्थानिक नेत्यांची आप्तस्वकीयांना तिकीट मिळविण्यापासून कसरत सुरू झाली आहे. आपला मुलगा, भाऊ व पुतण्या निवडून आला नाही, तर इज्जतीचा प्रश्न आहे. त्यामुळे निवडणूक लढवून धोका पत्करण्यापेक्षा त्यांना बिनविरोध करण्याची धडपड नेत्यांकडून मंगळवारी सुरू होती.
नेत्याचे रिंगणातील अप्तस्वकीय...
खासदार श्रीरंग बारणे यांचे पुतने निलेश बारणे, माजी खासदार गजानन बाबर यांच्या वहिनी शारदा बाबर, आमदार लक्ष्मण जगताप यांचे चुलत बंधू श्याम जगताप, आमदार महेश लांडगे यांचे बंधू सचिन लांडगे, माजी आमदार विलास लांडे यांचे चिरंजीव विक्रांत लांडे, राष्टÑवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांची पत्नी उषा वाघेरे, भाजपाचे माजी नगरसेवक राजू दुर्गे यांची कन्या तेजस्विनी दुर्गे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या पत्नी सोनम गव्हाणे, राष्टÑवादीचे नेते नाना शितोळे यांचे चिरंजीव अतुल शितोळे, माजी उपमहापौर मुरलीधर ढगे यांचे चिरंजीव दीपीका ढगे, स्थायी समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर भालेराव यांच्या पत्नी प्रतिभा भाजेराव, माजी विरोधी पक्षनेते तानाजी वाल्हेकर यांच्या पत्नी शोभा वाल्हेकर, शिवसनेचे उपशहरप्रमुख भगवान वाल्हेकर यांच्या पत्नी मंगल वाल्हेकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, माजी नगरसेवक रघुनाथ वाघ यांच्या पत्नी, माजी नगरसेवक हनमंत गावडे यांचे चिरंजीव विजय गावडे हेही रिंगणात आहेत.
पतीपत्नी रिंगणात...