पिंपरी - कोणे एकेकाळी पिंपरी-चिंचवड शहर हे दाट झाडींचे, गर्द सावलींचे, टेकड्यांचे शहर होते, असे सांगितल्यास खरे वाटणार नाही. मात्र मागील काही वर्षांपासून शहरात वाढत चाललेल्या वायुप्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या चालू वर्षातील तीन महिन्यांच्या आकडेवारीनुसार दिवसेंदिवस वायुप्रदूषणाने आरोग्य धोक्यात येत आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रशासनाने शहरातील प्रदूषण पातळी मोजण्याकरिता पाच ठिकाणे निवडली आहेत. यात पिंपरी-चिंचवड, भोसरी, कर्वे रस्ता, नळ स्टॉप आणि स्वारगेट यांचा समावेश आहे. तीन महिन्यांतील आकडेवारीचा अभ्यास केला असता, साधारणपणे शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार होण्याचा धोका असल्याचे दिसून आले आहे. याविषयी अधिक माहिती देताना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नितीन शिंदे म्हणाले की, उन्हाळ्यात हवी हलकी राहते. त्यामुळे धूलिकण तरंगत राहण्याचे प्रमाण वाढल्याने श्वसनास अडथळा निर्माण होतो. जास्त धूलिकणाच्या वातावरणात श्वसनाचे विविध आजार होण्याच्या धोका संभवत असल्याचे पाहवयास मिळते. मागील तीन महिन्यांत वातावरणात तरंगणाऱ्या या धूलिकणांचे प्रमाण हे जास्तीत जास्त १८६ मायकोग्रॅम प्रतिलिटर इतके असून, सल्फरडाय आॅक्साईड आणि नायट्रस आॅक्साईड यांचे प्रमाण अनुक्रमे ५४ आणि १४७ मायक्रोग्रॅम प्रतिलिटर एवढे आहे. सर्वसाधारण परिणाम, श्वसनास अडथळा निर्माण होण्यासारखी परिस्थिती, फुप्फुसांचे विकार असणाºया व्यक्ती, मुले, प्रौढ व्यक्ती, निरोगी व्यक्तींच्या श्वसनावर परिणाम करेल अशी परिस्थिती या कारणांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण आकडेवारीचे वर्गीकरण केले आहे. वायुप्रदूषणामुळे दैनंदिन श्वासोच्शवलसाकरिता लहान मुले, आणि प्रौढांना त्रास सहन करावा लागत असल्याचेदिसून आले आहे. दिल्लीनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सर्वांत जास्त प्रदूषण असल्याचे समोर आले आहे. प्रदूषण मापन करणाºया संस्थेच्या संकेतस्थळावर पुण्यातील हवेत मुंबईहून अधिक प्रदूषण नोंदवले गेले आहे.सातत्याने खालावत जाणाºया वायुप्रदूषणामुळे दैनंदिन श्वासोच्छ्वासाकरिता लहान मुले आणि प्रौढांना त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून आले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सर्वांत जास्त प्रदूषण असल्याचे समोर आले आहे. प्रदूषण मापन करणाºया संस्थेच्या संकेतस्थळावर हवेत प्रदूषण नोंदवले आहे.
पिंपरी-चिंचवड : प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 4:09 AM