- मंगेश पांडे पिंपरी : पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतील उद्योग ज्या कंत्राटी कामगारांच्या बळावर चालतात, त्या कंत्राटी कामगारांना अनेक कंपन्यांकडून दिवाळीत बोनसच दिला जात नाही. त्यामुळे शहरातील बोटावर मोजण्याइतक्या नामांकित कंपन्या सोडल्यास कंत्राटी कामगारांची दिवाळी बोनसविना जाण्याची शक्यता आहे. बोनसच कामगारांच्या हातात न पडल्याने लाखोंची उलाढाल होत असलेल्या बाजापेठेतील खरेदीवरही मोठ्या परिणाम होणार आहे.दिवाळी सणात नवीन वस्तूंची खरेदी करण्यासह कुटुंबीयांची हौसमौज पुरी केली जाते. यासाठी कामगारवर्ग दिवाळीत कंपनीकडून मिळणाऱ्या बोनसची वाट पाहतो. मात्र, औद्योगिकनगरीतील काही निवडक मोठ्या कंपन्या वगळता इतर छोट्या कंपन्यांतील कंत्राटी कामगारांना बोनसच दिला जात नाही, ही वस्तुस्थिती समोर आली आहे.शहरात २० मोठे, ४५० ते ५०० मध्यम, चार ते साडेचार हजार लघू आणि सुमारे पाच हजार सूक्ष्म उद्योग आहेत. त्यामध्ये हजारो कामगार काम करतात. यातील एकूण कामगारांपैकी ८० टक्के कामगार कंत्राटी आहेत. या कंत्राटी कामगारांच्या बळावरच ही उद्योगनगरी चालते. मात्र, त्यांना कंपनीकडून, ठेकेदारांकडून पुरेशा सुविधा पुरविल्या जात नाहीत. दिवाळीत देण्यात येणाºया बोनसबाबतचीही अशीच स्थिती आहे. अनेक ठेकेदारांकडून कामगारांना बोनसच देण्याबाबत टोलवाटोलवी केली जाते.दरम्यान, कामगारांना बोनस देण्यासाठीची रक्कम कंपनीकडून ठेकेदाराला दिली जाते. मात्र, ती कामगारांपर्यंत पोहोचतच नाही. नेहमीप्रमाणे महिन्याचा जो पगार असेल तोच कामगाराच्या हातावर टेकविला जातो. यामुळे दिवाळीनिमित्त कपडे खरेदीसह विविध वस्तू खरेदीचे केलेले नियोजन कोलमडते. मात्र, याचे कंपनी मालकाचे अथवा ठेकेदारालाही गांभीर्य नसल्याने कामगार वर्गात नाराजीचा सूर आहे.अंमलबजावणीची औपचारिकताउद्योगनगरीतील मोठ्या कंपन्यांतील कायमस्वरुपी कामगारांनाच बोनस दिला जातो. पूर्वी हा बोनस कामगार प्रतिनिधी व व्यवस्थापन यांच्यात चर्चा करून दिला जायचा. यामुळे कामगारांना अधिकचा बोनस मिळायचा. आता मात्र, बोनस अॅक्टची अंमलबजावणी केली आहे, हे दाखविण्यासाठी जेवढा बोनस होईल, तेवढाच कामगारांच्या हातावर टेकविला जात आहे.बोनस म्हणजे महिन्याला हातात येणाºया पगाराच्या रकमेपेक्षा अधिक रक्कम मिळते. यामुळे बाजारपेठेतील खरेदीवर भर दिला जातो. कपडे खरेदीसह विविध वस्तू खरेदीचे नियोजन केले जाते. खरेदी करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांमध्येही उत्साहाचे वातावरण असते. मात्र, बोनसच मिळत नसल्याने कामगार वर्ग खरेदीसाठीही बाजारपेठेकडे वळला नाही. यामुळे बाजारपेठेतील उलाढालीवर परिणाम होण्याचीही शक्यता आहे.ज्या कामगारांच्या हातावर ही उद्योगनगरी चालते. अशा कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस देणे आवश्यक असतानाही दिला जात नाही. गोरगरीब व कंत्राटी कामगारांच्या बोनसची रक्कम ठेकेदारच गिळंकृत करतात . त्यामुळे या कंत्राटी कामगारांचा दिवाळीत भ्रमनिरस होत असून, हा एकप्रकारचा अन्याय आहे. कायम कामगारांनाही बोनसची ठरावीकच रक्कम दिली जात आहे.- यशवंत भोसले, अध्यक्ष, राष्ट्रीय श्रमिक आघाडीकंपनीकडील कामगार असो अथवा कंत्राटी कामगार असो जो कामगार बोनसच्या नियमात बसतो. अशा प्रत्येक कामगाराला बोनस द्यायलाच हवा. कंपनी मालकांसह ठेकेदारांनीही त्याची अंमलबजावणी करायला हवी.- संदीप बेलसरे, अध्यक्ष,पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना
पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतील कंत्राटी कामगार बोनसविना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 1:50 AM