पिंपरी : औद्योगिकनगरीतील कोरोनाची रुग्णसंख्या पाचशेच्या आत आल्याने आणि रुग्णवाढीचा दर साडेआठ टक्यांवर आल्याने लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले आहेत. अत्यावश्यक सेवेसह, सर्व दुकाने मंगळवार पासून सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत खुली राहणार असली तरी पीएमपीएमल बस, हॉटेल, उद्याने बंदच राहणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
कोरोनाचा आलेख कमी झाल्याने ज्या शहरांचा रुग्णवाढीचा दर हा दहा टक्यांपेक्षा कमी आहे, अशा ठिकाणी महापालिकांना स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेचा रुग्णवाढीचा साडेआठ टक्के आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी प्रशासनाची बैठक घेतली. स्वतंत्र नियमावली जाहीर केली आहे.
राजेश पाटील म्हणाले, ‘‘आतार्पयत अत्यावश्यक सेवेतील दुकाने ही सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरु होती. मात्र, आता या दुकानांबरोबरच इतर कापड, भाजी मार्केट, ज्वेलर्स, कटींग सलुनची दुकाने आदींसह इतर आस्थापना या सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु राहणार आहेत. कामांचे सर्व दिवस बँका आणि मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सुरू राहणार आहेत. त्याची अंमलबजावणी १ जूनपासून केली जाणार आहे.’’................................यांना नाही परवानगी१) मॉल्सला परवानगी दिलेली नाही. तसेच हॉटेल, रेस्टॉरेन्टमध्ये पूर्वी प्रमाणेच पार्सलची सेवा उपलब्ध असणार आहे.२) दुपारी २ नंतर सर्व दुकाने बंद राहणार असून केवळ मेडीकल दुकाने सुरु राहणार आहेत. शासकीय कार्यालयातील उपस्थिती ही २५ टक्के असणार आहे. कोणत्याही प्रकारची होम डिलिव्हरीला परवानगी असणार आहे. तसेच शेतीविषयक दुकाने आठवड्याच्या सातही दिवस सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत खुली राहणार आहेत..................काय राहणार सुरू१) अत्यावश्यक सेवामधील दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ वाजपेर्यंत सुरू राहातील.२) महापालिका क्षेत्रातील बँकाचे काम सर्व दिवस सुरू राहातील.३) अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ वाजपेर्यंत सुरू राहणार आहेत. रेस्टॉरंट व बार हे केवळ पार्सल व घरपोच सेवेसाठी सुरू राहतील.४) ई-कॉमर्स मार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त वस्तू यांची घरपोच सेवा सुरू करण्यास मूभा राहील.५) दुपारी ३ वाजल्यानंतर वैद्यकीय सेवा व इतर अत्यावश्यक कारण, अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास संपूर्णत: प्रतिबंध राहील.६) सर्व शासकीय कार्यालये २५ टक्के अधिकारी, कर्मचाºयांच्या उपस्थितीत सुरू राहतील.७) मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ वाजपेर्यंत सुरू राहातील.