शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

Pimpri Chinchwad Lockdown Guidelines: डेल्टा प्लस, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; पिंपरी चिंचवड महापालिकेकडून कडक निर्बंधांसह नवीन नियमावली जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 8:12 PM

पिंपरीत सोमवारपासून नवीन नियमावलीचे पालन बंधनकारक; दुकाने पुन्हा सकाळी ७ ते दुपारी चार पर्यंत सुरू राहणार

आठवड्यात नियमात बदल सोमवारपासून पुन्हा चार नंतर दुकाने बंद राहणार

 

पिंपरी: कोरोनाचा पॉझिटिव्हीटी दर पाचच्या वर गेला आहे.  डेल्टा, डेल्टा प्लस व्हेरियंट आढळून आल्याने, तिसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाल्याने पिंपरी- चिंचवड शहरातील निर्बंधांमध्ये कडक केले आहेत. सोमवारपासून  अत्यावश्यक सेवेतील दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. तर, शनिवार व रविवार पूर्णपणे बंद राहतील. सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी, संचारबंदी लागू राहणार आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी जाहिर केले. 

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर मागील आठवड्यात  निर्बंध शिथिल केले होते. सर्व दुकाने सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली होती. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर नागरिकांची बेफिकिरीमुळे रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. दिवसाला २४५ च्या पुढे रुग्ण  सापडू लागले. त्याचबरोबर राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका देखील वाढू लागला आहे. त्यामुळे आता महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनीही पिंपरी- चिंचवड शहरातील निर्बंधांमध्ये वाढ केली आहे. शहरातील आधीच्या नियमावलीमध्ये केला आहे.............. सोमवारपासून पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. तर, शनिवार आणि रविवार पूर्णपणे बंद राहतील. ..............सुरू काय राहणार आणि बंद काय ?१)  पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा मधील नमूद दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील.२) अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त इतर दुकाने  सोमवार शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवार व रविवार पूर्णतः बंद राहतील.३) मॉल, सिनेमागृह  नाट्यगृह, संपूर्णतः बंद राहतील.४).रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे सोमवार ते दुपारी ४वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. दुपारी ४नंतर तसेच शनिवार व रविवार फक्त पार्सल सेवा, घरपोच सेवा रात्री ११ पर्यंत सुरु राहील.५) लोकल ट्रेन मधून फक्त वैद्यकीय सेवेसाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व महिलांसाठी शासकीय कर्मचारी, विमानतळ सेवा, बंदरे सेवा,यांच्या कर्मचाऱ्यांना प्रवास करणेस परवानगी राहील.६) पालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे ( उद्याने ) खुली मैदाने, चालणे व सायकलिंग आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत सुरु राहतील.७) सूट देण्यात येत असलेल्या आस्थापना, व्यतिरिक्त सर्व खाजगी कार्यालये कामाचे दिवशी पन्नास टक्के  कर्मचारी क्षमतेने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील.८) पालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा व कोविड व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय कार्यालये  शंभर क्षमतेने सुरु राहतील.९) शासकीय कार्यालये अत्यावश्यक, कोरोना विषयक कामकाज करणाऱ्या कार्यालयां व्यतिरिक्त , पन्नास टक्के, अधिकारी , कर्मचारी उपस्थितीत सुरु राहतील.  कार्यालये, आस्थापना यांना यापेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित असणे आवश्यक असल्यास संबंधित आस्थापना प्रमुख यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांची परवानगी घ्यावी.१०)  सर्व आउटडोअर स्पोर्ट्स सर्व दिवस सकाळी ५ ते ९ या वेळेत सुरु असणार.१२) सामाजिक, धार्मिक कार्यक्रम व मनोरंजन कार्यक्रम यास ५० लोकांच्या उपस्थितीत सोमवार ते शुक्रवारदुपारी ४ वाजपर्यंत परवानगी राहील. उपरोक्त कार्यक्रमाचा कालावधी हा ३ तासांपेक्षा जास्त असू नये,  ठिकाणी खाद्यपदार्थचे सेवन करण्यास प्रतिबंध राहणार आहे.............१) महापालिका क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी पूर्णपणे बंद राहतील. याठिकाणी दैनंदिन पूजा,धार्मिक विधी करण्याकरिता परवानगी 

२) लग्न समारंभ कार्यक्रम जास्तीत जास्त ५० लोकांची उपस्थिती बंधनकारक 

३) अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त २० लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील.

४) पालिका क्षेत्रामधील ज्या बांधकामाच्या ठिकाणी कामगारांची राहण्याची व्यवस्था आहे असे बांधकाम सुरु ठेवता येतील. तथापि, बाहेरून येणारे कामगार असल्यास असे बांधकाम दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी राहील. मात्र बाहेरून येणारे कर्मचारी हे दुपारी ४ वाजता तेथून घरी जाण्यासाठी बाहेर पडतील.

५) व्यायामशाळा, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा, आसन क्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने पूर्व नियोजित वेळेनुसा दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार मात्र, शनिवार व रविवार पूर्णतः बंद 

६) प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये पंधरा जुलैपर्यंत बंद राहणार

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याcommissionerआयुक्त