पिंपरी चिंचवड : तोंडाला रुमाल बांधून आलेल्या टोळक्याने वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याची घटना मोहननगरमध्ये घडली आहे. ही घटना बुधवारी सकाळी (14 फेब्रुवारी) सकाळी घडली, तर मंगळवारी (13 फेब्रुवारी ) रात्री नंग्या तलवारी नाचवत घरकुलमध्ये टोळक्याने दहशत माजवली. या दोन्ही घटनांमुळे परिसरात घबराहट पसरली आहे. या दोन्ही घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी व्यापा-यांनी दुकानं बंद ठेवली आहेत. गेल्या काही दिवसांत पिंपरी चिंचवडमध्ये गुंडाराज वाढू लागले आहे. पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कारवाईला जुमानले जात नसल्याचं यावरुन दिसत आहे. स्थानिक गुंडांची दहशत रोखण्यासाठी पोलिसांनी तातडीने पाऊल उचलावे, यासाठी घरकुलवासीयांनी शेकडो स्थानिक नागरिकांसह मोर्चा निगडी पोलीस ठाण्यावर नेला होता.
पोलीस तात्पुरती कारवाई करून गुंडांना सोडून देतात,त्यामुळे पोलिसांचा त्यांच्यावर वचक राहिला नाही, असा आरोप घरकुलवासीयांनी पोलिसांवर केला आहे. घरकुल फेडरेशनच्या पुढाकाराने स्वयंस्फूर्तीने नागरिकांनी निगडी पोलीस ठाण्यावर सकाळी 11 वाजता मोर्चा काढला. यावेळी घरकुलवासीय असुरक्षित असल्याचे निवेदन देण्यात आले. आबीजलीनगर, मोहननगर, घरकुल निगडी भागांत गुंडांकडून दहशत पसरवण्याच्या घट घडण्याच्या घटया घटना नित्याच्या झाल्या आहेत.