पिंपरी : अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद असे दोन दिवस सुट्टी आहे. त्यानंतर शनिवार आणि रविवार अशा दोन दिवस सुट्टया आहेत. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना चार दिवस सुट्टी मिळणार आहे. गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी होणार आहे. तसेच ईद-ए-मिलाद शुक्रवारी आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दोन दिवस सुट्ट्या जाहीर केले आहेत.
तसेच पाच दिवसांचा आठवडा असल्याने शनिवार आणि रविवार शासकीय कार्यालयांना सुट्टी असते. उद्यापासून सलग चार दिवस शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टी असणार आहे. गुरुवार आणि शुक्रवार अशा दोन सुट्टीबाबतचे आदेश महापालिकेचे प्रशासन विभागाचे आयुक्त सहाय्यक आयुक्त विठ्ठल जोशी यांनी काढले आहेत.