शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कार्यालयीन कामकाजावेळी अधिकारी गायब, ३४ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 13:56 IST

अधिकारी कार्यालयात गैरहजर असल्याने त्यांना भेटण्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात.

पिंपरी : महापालिकेत प्रशासकीय राजवटीत नागरिक अनेक विभागांत कामे घेऊन येतात. मात्र, विभागातील अधिकारी जागेवर नसल्याने भेटत नव्हते. त्यामुळे आयुक्त शेखर सिंह यांनी नागरिकांना भेटण्यासाठी अधिकारी उपलब्ध व्हावेत, यासाठी वेळ ठरवून दिली. मात्र, आता या भेटीच्या वेळेत बहुतांशी अधिकारी कार्यालयात नसतात. याबाबत आयुक्तांनी सामान्य प्रशासन विभागाकडून अहवाल मागितला असून, भेटीच्या वेळी वारंवार अनुपस्थित राहणाऱ्या ३४ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत.महापालिकेचे कार्यालयीन कामकाज सकाळी १० ते सायंकाळी पावणेसहापर्यंत सुरू असते. या वेळेत विविध कामानिमित्त नागरिक महापालिकेच्या विविध कार्यालयांत, विविध अधिकाऱ्यांकडे येत असतात. परंतु, अधिकारी कार्यालयात गैरहजर असल्याने त्यांना भेटण्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून ते साईटवर, बैठकीला किंवा कार्यक्रमाला असल्याचे कारण दिले जाते. याबाबत वारंवार तक्रारींमुळे आयुक्त सिंह यांनी नागरिकांना भेटण्यासाठी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे तीन दिवस दुपारी ३ ते सायंकाळी ६ ही वेळ निश्चित केली. त्यानुसार कार्यालयात नागरिकांसाठी उपलब्ध राहण्याचे निर्देश दिले.विभाग प्रमुखांसह सर्वच अधिकाऱ्यांनी दालनाच्या दरवाजावर नागरिकांना भेटण्याच्या वेळेचे फलक लावले. पण, त्या वेळेतच अधिकारी उपस्थित नसतात. ही बाब लक्षात आल्याने आयुक्तांच्या सूचनेनुसार सामान्य प्रशासन विभागाच्या तपासणी पथकाने सर्व कार्यालयांची पाहणी केली. यात दहा दिवसांचा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीचा अहवाल तयार करून तो आयुक्तांकडे सादर केला आहे. यामध्ये ३४ अधिकारी एकपेक्षा अधिकवेळा गैरहजर असल्याचे दिसून आले. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश आयुक्त सिंह यांनी दिले आहेत.हे अधिकारी गैरहजर...पथकाने केलेल्या दहा दिवसांच्या तपासणीत सर्वाधिक चार दिवस लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन, सहायक आयुक्त अमित पंडित गैरहजर आढळून आले. नंतर अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता बाबासाहेब गलबले, सहायक आयुक्त तानाजी नरळे, उमेश ढाकणे, महेश वाघमोडे हे तीन दिवस जागेवर नव्हते. तर अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण, नगररचना उपसंचालक प्रसाद गायकवाड, उपायुक्त मनोज लोणकर, सचिन पवार, पंकज पाटील, अण्णा बोदडे, सीताराम बहुरे, राजेश आगळे, प्रदीप ठेंगल, सहशहर अभियंता संजय खाबडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे, सहायक आयुक्त अविनाश शिंदे, शीतल वाकडे, अजिंक्य येळे, विजय थोरात, मुकेश कोळप, सुचिना पानसरे, श्रीकांत कोळप, किशोर ननवरे, आयटीआय प्राचार्य शशिकांत पाटील, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे यांचाही एक-दोन वेळा भेटण्याच्या वेळी उपस्थित न राहणाऱ्यांमध्ये समावेश आहे.

महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार, नागरिकांना भेटण्याची वेळ निश्चित करून दिली आहे. तपासणी पथकाने पाहणी करून दिलेला हा अहवाल तयार करण्यात आला. नागरिकांना भेटीसाठी उपलब्ध न राहणाऱ्या विभाग प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस देण्याबाबत आयुक्तांनी सूचना दिल्या आहेत. - विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग, पिंपरी-चिंचवड

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रMuncipal Corporationनगर पालिकाcivic issueनागरी समस्याPuneपुणे