पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ३५व्या वर्धापनदिनी सामाजिक भान जपावे, मनोरंजनासह गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्या, रक्तदान शिबिर उपक्रम राबवा, अशा सूचना करण्यात आल्या.महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभागृहात झालेल्या बैठकीस सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती लक्ष्मण सस्ते, शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी, महिला व बाल कल्याण समिती सभापती सुनीता तापकीर, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास ऊर्फ बाबा बारणे, प्रभागाध्यक्ष अश्विनी जाधव, भीमाबाई फुगे, साधना मळेकर, अंबरनाथ कांबळे, तसेच अंबादास चव्हाण, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके, सहायक आयुक्त योगेश कडुसकर, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, मनोज लोणकर, आशा राऊत उपस्थित होते.बैठकीत गतवर्षीच्या वर्धापनदिन कार्यक्रमाचा आढावा घेण्यात येऊन या वर्षाच्या नियोजनासंदर्भात विविध मान्यवरांच्या सूचना विचारात घेऊन विविध कार्यक्रमांचे, क्रीडा स्पर्धांचे, विविध मान्यवरांचे सत्कार आदीबाबत आयोजन करण्यात यावे, असे महापौरांनी सांगितले.लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिकांनी प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन प्रभाग स्वच्छ ठेवावा, यासाठी स्वच्छ प्रभाग स्पर्धा घ्यावी, अशी सूचना महापौरांनी केली. रोज किमान एक तास स्वच्छतेसाठी दिल्यास आपला प्रभाग नक्कीच स्वच्छ राहील. वर्धापन दिनी आयोजित करण्यात येणाºया रक्तदान शिबिरात किमान हजार दात्यांनी रक्तदान करावे. चांगले काम करणाºया महापालिकेच्या वर्ग १ ते ४ पर्यंतच्या प्रत्येकी पाच अधिकारी व कर्मचाºयांचा गौरव करावा, असेही पवार यांनी सांगितले. सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी सूत्रसंचालन केले.रक्तदान शिबिर : कर्मचारी, अधिकाºयांसाठी स्पर्धांया बैठकीत शहरातील गुणवंत कामगारांचा सत्कार, औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया उद्योजकांचा सत्कार, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या विविध क्रीडा स्पर्धा, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम याविषयी नियाजन झाले. क्षेत्रीय कार्यालयांसह मनपा मुख्य इमारतीत रक्तदान शिबिर ठेवून किमान हजार जणांनी रक्तदान करावे यासाठी नियोजन करण्याच्या सूचना पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिल्या. नावीन्यपूर्ण प्रकल्पाचे उद्घाटन व उपक्रम घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका वर्धापनदिनी जपणार सामाजिक भान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 2:40 AM