पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू आहे. ब क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. ५२ व ५३ येथील वाकड येथे बुधवारी कारवाई करण्यात आली. एकूण नऊ बांधकामांवर कारवाई करण्यात आली. चिंचवड विधानसभा मतदारसंघ सोडून अन्य ठिकाणी कारवाई होत नसून, कारवाईत दुजाभाव केल्याचा आरोप केला जात आहे.अनधिकृत बांधकामांसंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेच्या सुनावणीत आदेशानुसार पिंपरी-चिंचवड परिसरातील अनधिकृत बांधकामे रोखण्यासंदर्भात उपाययोजना कराव्यात, अशा सूचना आहे. मात्र, महापालिका परिसरात केवळ छोटी मोठी कारवाई दाखविली जाते.सध्या भोसरी, चिखली, चºहोली, मोशी, पिंपरी, सांगवी, नवी सांगवी, दापोडी, पिंपळे गुरव, सौदागर, रहाटणी, काळेवाडी, थेरगाव, वाकड, ताथवडे, तळवडे, रावेत,आकुर्डी, चिंचवड, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. मात्र, अनधिकृत बांधकाम विभाग कारवाई करताना दिसतनाही.किरकोळ बांधकामांवर कारवाईपिंपरी-चिंचवड महापालिकेचे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने सुरू असलेले अनधिकृत आर.सी.सी. बांधकाम व पत्राशेडवर कारवाई केली. कारवाईमध्ये २२२१ चौरस फूट असलेले ०२ आरसीसी अनधिकृत बांधकाम व २६०२ चौरस फूट असलेले ०७ अनधिकृत पत्राशेडवर कारवाई केली.तसेच ९५०१ चौरस फूट असलेले ७ अनधिकृत पत्राशेड मालक आॅक्युपायर, विकासक यांनी स्वत:हून काढून घेतले. ही कारवाई पालिकेचे कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता आबासाहेब ढवळे, कनिष्ठ अभियंता व बीट निरीक्षक यांच्या पथकाने केली.या वेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त उपलब्ध होता. कारवाईस १७ पोलीस, ०२ जेसीबी १ ट्रक, व २० मनपा कर्मचारी यांचे सहकार्याने करण्यात आली.कारवाई : फक्त चिंचवड विधानसभा क्षेत्रातअनधिकृत बांधकामे हटवण्याच्या कारवाई फक्त चिंचवड विधानसभा मतदारसंघात होत आहे. भोसरी आणि पिंपरी मतदारसंघातील बांधकामांवर कारवाई करण्यात येत नाही. भोसरीतील राजकीय नेते आमच्या विभागात फिरकू नका, असा दम अधिकाºयांना देत आहे. त्यामुळे बांधकामे सुरू असूनही कारवाई होताना दिसून येत नाहीत. चिंचवड, वाकड आणि ताथवडे, काळेवाडी, रहाटणी, थेरगाव परिसरात कारवाई केली जात आहे. राजकीय द्वेषातून कारवाई सुरू असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.याबाबत आयुक्त आणि प्राधिकरणाचे मुख्याधिकारी यांना नागरिकांनी निवेदन दिले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका : ‘अनधिकृत’बाबत प्रशासनाचा दुजाभाव? नऊ बांधकामांवर महापालिकेकडून कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 3:28 AM