पिंपरी : पुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या व क्षेत्रफळ निम्मे असतानाही तब्बल १०० कोटींनी अधिकचा सुमारे सहा हजार १८३ कोटींचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीपुढे सोमवारी सादर केला. विशेष म्हणजे कोणतीही करवाढ व दरवाढ या अर्थसंकल्पात सुचविण्यात आलेली नाही. तरीही गतवर्षाच्या तुलनेत सुमारे ९०० कोटींनी बजेट वाढले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या अर्थसंकल्पात लोकप्रिय योजना जाहीर करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे पिंपरी महापालिकेच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नसल्याने शहरवासीयांना दिलासा मिळणार आहे. गतवर्षी महापालिकेने सुमारे पाच हजार २८३ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. मात्र, गेल्या वर्षभरात अनेक योजनांना उशिरा मान्यता मिळाली. तसेच, निविदा प्रक्रियेसही विलंब झाल्याने आरंभीची शिल्लक ८८६ कोटींनी वाढली आहे. शिवाय केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचे अनुदान सुमारे २०० कोटी, योजनांमधील महापालिकेचा हिस्सा २७१ कोटी अशा पद्धतीने बजेट वाढले.
महापालिकेच्या २०१९-२० च्या मूळ चार हजार ६२० कोटींच्या अर्थसंकल्पात केंद्र व राज्य शासनाचे अनुदान व प्रारंभीची शिल्लक जमा झाल्याने सहा हजार १८३ कोटींपर्यंत फुगवटा झाला आहे. त्यामध्ये २०० कोटींचे बॉँड, आरंभीच्या शिलकीत २९३ कोटींची वाढ, विविध ठेवींच्या व्याजात २७ कोटी, इतर विभाग जमा रकमेत १२ कोटी व करसंकलनात १७ कोटींची वाढ झाली आहे. त्यामुळेपुणे महापालिका आयुक्तांना २०१९-२० या वर्षांच्या सुमारे सहा हजार ८५ कोटींच्या अर्थसंकल्पाच्यातुलनेत पिंपरी महापालिका सुमारे १०० कोटींनी श्रीमंत झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
खर्चाच्या बाजूला योजनाच्या कामांसाठी महापालिका हिश्श्यापोटी २१३१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच पाणीपुरवठा विभागासाठी २४३ कोटी, वैद्यकीय विभागासाठी १७१ कोटी, आरोग्यासाठी २४२ कोटी, प्राथमिक आणि दुय्यम शिक्षणासाठी १९२ कोटी, सार्वजनिक सुरक्षितता व स्थापत्यसाठी २०८ कोटी रुपये अशा प्रमुख तरतुदी आहेत. सातव्या वेतन आयोगासाठी ८० कोटी रुपये राखून ठेवले आहेत. तसेच स्मार्ट सिटी (१५० कोटी), अमृत अभियान (७२.५० कोटी) , स्वच्छ भारत अभियान (१०.३८ कोटी) आणि पंतप्रधान आवास योजना (३६.३९ कोटी) अशी तरतूद आहे.विकास कामांसाठी १३६४ कोटी रुपयांची भरीव तरतूद४विशेष योजनेंतर्गत ११२५ कोटींची तरतूद४नदी सुधार प्रकल्पासाठी २०० कोटी रुपयांचे बाँड उभारणार४आंद्रा, भामा-आसखेडकरिता २८ कोटींचा निधी४स्मार्ट सिटीसाठी १५० कोटी रुपये राखीव४प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ३६.३९ कोटी४अमृत योजनेसाठी ७२.५० कोटी रुपये४रावेत बंधारा सक्षमीकरणासाठी ५.७५कोटींची तरतूद४पर्यावरणपूरक ग्रीन बससाठी १० कोटी राखीव४शहरी गरिबांसाठी (बीएसयूपी) ९९३ कोटी४पीएमपीएमएलकरिता १९०.८२ कोटींची तरतूद४शहरात टाऊन प्लॅनिंग स्कीमचा वापर करून आयटी हब स्थापन करणार४ऐतिहासिक वारसा जतन करण्याकरिता संग्रहालयाची निर्मिती करणार४नगररचना भू-संपादनासाठी १४० कोटी रुपये राखीव४जेंडर बजेट (महिलांच्या विविध योजना) ४०.९५ कोटी राखीव४महापौर विकास निधीसाठी ५ कोटींची तरतूद४अपंग कल्याणकारी योजनेकामी ३३.१४ कोटी राखीव४पाणीपुरवठा योजनांसाठी ८८ कोटींचा विशेष निधी४अतिक्रमण निर्मूलन व्यवस्थेकामी २.३० कोटींची तरतूद४स्वच्छ भारत मिशनसाठी १०.३८ कोटींची तरतूदगतवर्षी महापालिकेच्या अनेक योजनांना केंद्र व राज्य शासनाकडून उशिरा मान्यता मिळाली. त्यामुळे निविदा प्रक्रियेला विलंब झाल्याने आरंभीची शिल्लक रक्कम ८८६ कोटी इतकी राहिली. तसेच, बचत व व्याजाची रक्कम वाढली आहे. भूसंपादनास उशीर झाल्याने खर्चाची रक्कम शिल्लक असल्याने अंदाजपत्रकाचा आकार वाढलेला आहे.- श्रावण हर्डीकर, आयुक्त,पिंपरी-चिंचवड महापालिकापुणे व पिंपरी-चिंचवड(अर्थसंकल्प २०१९-२०)शहर लोकसंख्या क्षेत्रफळ अंदाजपत्रकपुणे ५५ लाख ३३१ चौ. किमी. ६०८५ कोटीपिंपरी २५ लाख १८१ चौ. किमी. ६१८३ कोटी