ऑनलाइन लोकमत
पिंपरी चिंचवड, दि. 1 - वडमुखवाडी येथे चोरट्यांनी घरात घुसन केले 92 हजार रुपयांचे दागिने लंपास केलेत. यामध्ये 66 वर्षीय आजीच्या कानातले दागिने हिसकावल्याने आजीचे दोन्ही कानांना दुखापत झाली आहे. बुधावारी (31 मे) रात्री उशीरा ही घटना घडली आहे.
सुभद्रा जगनाथ तापकीर (वय 66) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्या रात्री घरात एकट्या होत्या व त्यांची मुलं, नातवंड उन्हाळ्यामुळे घराच्या छतावर झोपण्यासाठी गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरात घुसून आजीला गुंगीचे औषध दिले.
यानंतर घरातील व कपाटातील असे 92 हजार रुपयांचे तब्बल साडेआठ तोळे सोने चोरुन पोबारा केला. चोरट्यांनी आजीच्या कानातले हिसकावल्यानं यात त्या जखमी झाल्या आहेत. मात्र त्याक्षणी याची जाणिव न झाल्याने हा प्रकार सकाळी कुटुंबीयाना लक्षात आला य दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.