पिंपरी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) रावेत येथील पाणीपुरवठा केंद्रातील देखभाल दुरुस्तीची कामे गुरुवारी (दि.२) दिवसभर होणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पाण्याचा पुरवठा कमी दाबाने व अपुरा होण्याची शक्यता आहे.
तरी पिंपरी-चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी, सीएमई, दिघी, व्हीएसएनएल, कॅन्टोन्मेंट बोर्ड, ओएफडीआर या भागातील नागरिकांचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी अगोदरच पाण्याचा साठा करण्याची काळजी घ्यावी, असे आवाहन एमआयडीसीचे स्थापत्य विभागाने कळविले आहे.