शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

जनतेच्या पैशांवर डल्ला हेच पिंपरी-चिंचडकरांचं दुर्दैव : अजित पवारांचं भाजपवर टीकास्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2021 9:28 PM

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीतील लाच प्रकरणानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार एका खासगी कार्यक्रमासाठी शहरात आले होते.

पिंपरी : शहराच्या इतिहासात लाच प्रकरणी स्थायी समिती अध्यक्षाला अटक होण्याची घटना कधी घडली नव्हती. मात्र, महापालिकेत भाजपची सत्ता असताना अशा प्रकारची घटना घडली. हे शहरातील सर्व नागरिक उघड्या डोळ्याने बघत आहेत. जनतेच्या कररुपाने गोळा झालेल्या पैशांवर अशा प्रकारचा डल्ला मारण्याकरिता जर कोणी पुढाकार घेत असतील. तर, हे पिंपरी-चिंचडकरांचे दुर्दैव आहे अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली  आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीतील लाच प्रकरणानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार एका खासगी कार्यक्रमासाठी शहरात आले होते. यावेळी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक अजित गव्हाणे, मयूर कलाटे, विक्रांत लांडे यावेळी उपस्थित होते.

लाच प्रकरणावर काय म्हणाले, अजित पवार अजित पवार म्हणाले, ‘‘राजीनामा घ्यावा की नाही हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु, आपल्या पिंपरी-चिंचवडच्या इतिहासात अशा पद्धतीची घटना कधी घडली नव्हती. महापालिकेत भाजपची सत्ता असताना अशी प्रकारची घटना घडली. हे शहरातील सर्व नागरिक उघड्या डोळ्याने बघत आहेत. मी १९९१ पासून २०१७ पर्यंत  २० वर्षे या शहराचे नेतृत्व केले. परंतु, अशा पद्धतीने कोणत्याही गोष्टी होऊ दिल्या नाहीत. जर यदा कदाचित छोटी-मोठी घटना झाली. तर, तिथल्या तिथे संबंधितांवर कडक अ‍ॅक्शन घेण्यासाठी मी मागेपुढे बघितले नाही.’’  ...........राष्ट्रवादीचेही दोषी आढळले तर कारवाई करूअजित पवार म्हणाले, ‘‘तपास पोलिसांच्या पद्धतीने चालू आहे. या प्रकरणाचा अहवाल मागविण्याचा अधिकार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना आहे. आम्ही एकमेकांच्या खात्यामध्ये लुडबूड करत नाही. पुणे जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांना सुविधा उपलब्ध करुन देणे आणि राजकीय हस्तक्षेप न होऊ देणे, काम करण्यासाठी त्यांना मोकळिक देणे. हे मी पाहतो. स्थायी समितीत कोणीही असले तरी चौकशी करणारी यंत्रणा त्यांचे काम करते. जोपर्यंत त्यात वस्तुस्थिती पुढे येत नाही. तोपर्यंत त्याबाबत अधिकचे भाष्य करणे उचित ठरणार नाही. पण, त्यात जे कोणी दोषी असतील. ते जर उद्या राष्ट्रवादीशी संबंधित अशातील. तर त्यांच्यावरही कारवाई करू.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारCorruptionभ्रष्टाचारBribe Caseलाच प्रकरणBJPभाजपा