पिंपरी - आकुर्डी गावठाण मधील सिद्धेश्वर क्लासिक सोसायटी समोर अक्षय स्क्रॅप सेंटरला शुक्रवारी सायंकाळी गॅस गळती झाल्याने आग लागली. त्यातचार जण जखमी झाले आहेत. घरामध्ये स्वयंपाक करत असताना गॅस गळती झाल्याने आगीने भडका घेऊन आग लागल्याचे समजते.
आकुर्डी गावठाण येथे भंगार मालाचे दुकान आहे. सायंकाळी सातला आग लागली. मयूर केदारे यांनी अग्निशामक दलास कळविले. त्यानंतर अग्निशामक दल दाखल्या झाले. आगीत मोठ्या प्रमाणात पुठ्ठे, प्लास्टिक स्क्रॅप, परफ्यूम बॉडी स्प्रे चे रिकामे कॅन, भंगार बॅटरी, घरगुती भंगार प्लास्टिक वस्तू आदी आगीमध्ये जळाले. प्राधिकरण उपग्निशमन केंद्र १, थेरगाव उप अग्निशमन केंद्र १, पिंपरी मुख्य अग्निशामक केंद्र २ वॉटर टेंडर वाहनाने आग विझविली. ३२ कर्मचारी वर्गाने शर्तीचे प्रयत्न केले.
भंगार दुकानाच्या आवरात पत्र्याची शेड आहे. त्यात चार जण राहत आहेत. पोपट आडसूळ (५०), संतोष चंनल(४५), श्रीकांत कांबळे (३२), नरेश चव्हाण (३८) आगीमध्ये भाजल्याने जखमी झाले. चारही जणांना स्थानिकांनी रिक्षा द्वारे वायसीएम रुग्णालयात पाठविले आहे.