पिंपरी : उद्योगनगरीतील वाहनचोरीचे प्रकार वाढतच आहेत. शहरात मंगळवारी (दि. २३) दोन चारचाकी व दोन दुचाकींची चोरी झाली. १५ लाख ८० हजारांची वाहने चोरट्यांनी लंपास केली. पिंपरी, चिखली व वाकड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील दि सेवा विकास को- ऑपरेटिव्ह बँकेच्या समोरील रस्त्यावर चारचाकी दोन वाहने लॉक करून पार्क केली होती. १५ लाख रुपये किमतीच्या या चारचाकी व त्यामध्ये असलेली कागदपत्रे चोरट्यांनी चोरून नेले आहेत. दोन्ही चारचाकी बँकेच्या नावे आहेत. मंगळवारी (दि. २३) रात्री साडेअकरा ते बुधवारी (दि. २४) पहाटे पाचच्या दरम्यान हा प्रकार घडला. चंदनकुमार चंद्रशेखर प्रसाद सिंह (वय २७, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
चिखलीतील ताम्हाणे वस्ती येथून इमारतीच्या पार्किंगमधून ५० हजारांची दुचाकी चोरून नेली. . याप्रकरणी शाम भरत शिंदे (वय २५, रा. ताम्हाणे वस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.काळेवाडीतील तापकीरनगर येथे राहात्या घराच्या पार्किं गमधून ३० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी धिरजकुमार रमेश मलये (वय २३, रा. तापकीननगर, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.