पिंपरी : पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस बार असोसिएशनने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. तसेच या मागणीसाठी सुरु असलेल्या मराठा मोर्चाच्या आंदोलकांवरील खटलेही मोफत लढणार असल्याची भूमिका वकील संघटनेने घेतला आहे. त्याबाबतचा ठराव विशेष सभा घेऊन एकमताने संमत करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस बार असोसिएशनने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. तसेच या मागणीसाठी सध्या सुरु असलेल्या मराठा मोर्चाच्या आंदोलकांवरील खटलेही ही वकील संघटना मोफत लढणार आहे. विशेष सभा घेऊन एकमताने हा ठराव संमत केला आहे.दरम्यान, चिंचवड पोलिसांनी अटक केलेल्या सात मराठा आंदोलकांची वकिलांनी काल मोफत सेवा देऊन सुटका केली. बार अध्यक्ष अॅड. राजेश पुणेकर म्हणाले,आंदोलकांना मोफत कायदेशीर मदत देण्यासाठी पाच वकिलांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात आतिश लांडगे, सुनील कड, विजय शिंदे, योगेश थंबा आणि गणेश राऊत यांचा समावेश आहे.
मराठा मोर्चाच्या आंदोलकांसाठी पिंपरी वकील निशुल्क लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 6:03 PM
पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस बार असोसिएशनने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे
ठळक मुद्देअटक केलेल्या सात मराठा आंदोलकांची वकिलांकडून मोफत सेवा देऊन सुटका