पिंपरी : कोरोनाचा आलेख कमी होत असल्याने शनिवार आणि रविवार असणारा विकेंड कडक लॉकडाऊन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, लॉकडाऊनमधील निर्बंध कायम असणार आहेत, अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी लॉकडाऊन शिथिल करण्यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. पुणे जिल्ह्यात शनिवार, रविवारी विकेंड लॉकडाऊन जाहिर केला होता. या दिवशी फक्त दूध विक्री नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवली होती. पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्या पाचशेच्या आत आली आहे. त्यामुळे निर्बंध काहीसे शिथील केले आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी विविध जिल्ह्यातील कोरोनाची आढावा बैठक झाली. यामध्ये विकेंड लॉकडाऊन रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, याबाबतचा आदेश पुणे महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालयाने काढला होता. पिंपरी-चिंचवड महापालिकेने आदेश काढला नव्हता. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांमध्ये गोंधळ होता. शनिवारी दुपारी याबाबत आदेश जारी केले आहेत...................................आदेशातील गोंधळाचा फटकाअनेकांनी अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी उघडली.त्यामुळे पोलीस आणि व्यावसायिकांमध्ये वादावादी झाली. दुपारी बारानंतर आयुक्त पाटील यांनी शहरातील विकेंड लॉकडाऊन रद्द केल्याचे जाहिर केले. आदेशातील गोंधळाचा फटका नागरिकांना बसला.............असा आहे नवा आदेश१) महापालिका हद्दीत शनिवार आणि रविवारीही अत्यावश्यक सेवा सुरू राहणार.२) सकाळी ७ ते ११ या वेळेत दुकाने खुली राहणार आहेत. त्यात किराणा, भाजी, दूध, बेकरी, चिकन व्यावसायिकांचा समावेश आहे...........शहरात विकेंड लॉकडाऊन असणार नाही. इतरदिवशी जे निर्बंध असतात तेच शनिवार, रविवारी लागू असणार आहेत. पूर्वी विकेंडला सर्व बंद होते. केवळ दूध विक्रीला सकाळी नऊ वाजेपर्यंत परवानगी होती. विकेंड लॉकडाऊन शिथिल करण्याचे निर्देश काल झालेल्या आढावा बैठकीत मिळाले होते. त्यानुसार सर्वांना तोंडी सांगितले होते. त्याचा आदेशही काढला आहे. पुढील नियमावलीचा सविस्तर आदेश काढणार आहे.-राजेश पाटील ( आयुक्त)
....
विकेंडलाही सुरू राहणार दुकानेपिंपरी : कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने पिंपरी-चिंचवड शहरात विकेंड लॉकडाऊन करण्यात आला होता. मात्र रुग्ण संख्या कमी झाल्याने हा आदेश मागे घेण्यात आला असून, शनिवारी व रविवारीही अत्यावश्यक सेवेतील तसेच किराणा दुकाने सकाळी सात ते ११ या वेळेत सुरू राहणार आहेत.
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबत शनिवारी (दि. २९) आदेश जारी केले आहेत. कोरोना महामारीमुळे नागरिकांनी घरातच थांबावे, असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र तरीही नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत असल्याने प्रशासनाकडून विकेंड लॉकडाऊन करण्यात आला. परिणामी खरेदीसाठी शनिवारी व रविवारी होणारी गर्दी टाळणे शक्य झाले.
नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईआठवड्यातील सर्व दिवस किराणा दुकाने तसेच अत्यावश्यक सेवेतील आस्थापना सुरू राहणार असल्या तरी नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करावा, विनाकारण घराबाहेर पडू नये, तसेच शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन करावे, अन्यथा पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे.