पिंपरी : पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील स्वारगेट ते पिंपरी महापालिका भवनपर्यंत धावणारी मार्ग ते निगडीपर्यंत वाढविण्याच्या सुमारे १०४८ कोटी रुपयांच्या विस्तारित आराखड्याला (डीपीआर) सर्वसाधारण सभेने गुरुवारी मंजुरी दिली. महापालिकेतर्फे हा आराखडा केंद्र व राज्य सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
महामेट्रोकडून पहिल्या टप्प्यातील स्वारगेट ते पिंपरी या मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. परंतु, ही मेट्रो पिंपरीऐवजी पुढे निगडीपर्यंत न्यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपा, शिवसेना, राष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसे आदी राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांनी केली होती. त्यानुसार महामेट्रोने निगडी मेट्रोचा डीपीआर तयार केला होता. स्थायी समितीने हा आराखडा मंजूर करून सर्वसाधारण सभेकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविला होता. आजच्या सर्वसाधारण सभेपुढे एकमताने हा विषय मंजूर केला. अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते.
महामेट्रोने ‘सिस्ट्रा’ या आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून हा डीपीआर तयार करून घेतला़ महापालिका भवन ते निगडीपर्यंत ही मेट्रो जाणार असून, या मार्गाचे एकूण अंतर ४.४१३ किलोमीटर असून, मार्गावर चिंचवड, आकुर्डी आणि निगडी या तीन ठिकाणी मेट्रो स्टेशन असणार आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी भूसंपादन करणे आणि सेवा वाहिन्यांचे स्थलांतर करणे आदी कामासाठी १०४८.२२ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यासाठी हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. या विषयावरील चर्चेत मनसे गटनेते सचिन चिखले म्हणाले, सर्वांनी पाठपुरावा केला म्हणून आराखडा मंजूर झाला. तर विरोधीपक्षनेते दता साने यांनी सविस्तर माहिती द्यावी, अशी मागणी केली. तर शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी स्टॅप ड्युटीचा मुद्दा उपस्थित केला. हिंजवडी ते चिखलीपर्यंत मेट्रो नेण्यात यावी, अशी मागणी सीमा सावळे यांनी केली. प्रमोद कुटे यांनी काळभोरनगर येथे स्टेशन उभारावे, अशी मागणी केली. मंगला कदम यांनीही या मागणीस पाठिंबा दिला. मेट्रोच्या सादरीकरणानंतर विषय मंजूर केला.
पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते निगडीदरम्यान उभारण्यात येणाऱ्या मेट्रो प्रकल्पासाठी वाढीव खर्चासह एक हजार २५३ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) महामेट्रोतर्फे तयार करण्यात आला असून, महापालिका सभेनेत्यास मान्यता दिली. या मार्गावर चिंचवड, आकुर्डी आणि निगडी या तीन ठिकाणी मेट्रो स्टेशन असणार आहे. पिंपरी-निगडीदरम्यान धावणाºया मेट्रोचे पुणे-पिंपरी-चिंचवड मेट्रो नामकरण करण्याच्या उपसूचनेला मंजुरी देण्यात आली. शिवाजीनगर ते हिंजवडीमेट्रोमार्ग वाकडमध्ये महापालिकेच्या आताच्या व भविष्यात समाविष्ट होणाºया भागातून जातो. तेथे मेट्रोचे काही खांब उभारण्यात येत आहेत. मेट्रोचे काम करण्यासाठी पीएमआरडीएला परवानगी देण्याच्या प्रस्तावाला स्थायीने यापूर्वी मंजुरी दिली आहे.निगडीपर्यंत मेट्रोच्या डीपीआरला मंजुरी दिली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना फायदा होणार आहे. वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे. दुसºया टप्प्यातील कासारवाडी ते चाकणपर्यंत मेट्रो डीपीआरचे काम सुरू आहे. तसेच हिंजवडी ते चाकणला जोडणारी मेट्रोही असावी, याबाबत आग्रही राहणार आहे. लवकरात लवकर काम करून नागरिकांना मेट्रोची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. - राहुल जाधव, महापौरनिगडी मेट्रोचे फायदे४शहराला जोडणारा वेगवान मार्ग४पिंपरी ते निगडी वेळेची बचत४मेट्रो मार्गामुळे हवेचे प्रदूषण नाही४वाहतूककोंडीतून मुक्तता४रस्ता दुरुस्तीच्या खर्चात बचत४महामार्गावरील अपघात कमीनिगडीपर्यंत मेट्रो न्यावी, अशी नागरिकांची मागणी होती. त्यानुसार डीपीआर तयार करण्याचे काम सुरू होते. ते पूर्ण झाले आहे. मेट्रो लवकर व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे. - एकनाथ पवार, पक्षनेते, भाजपा