पिंपरी : पीएमपीएलएमध्ये ठेकेदारी पद्धतीने चालक घेतले जात असतानाच, आता वाहक पदासाठी कंत्राटी भरतीचा घाट घातला जात आहे. वाहक हा पीएमपीएलएचा अतिशय महत्त्वाचा घटक असून, कंत्राटी पद्धतीने त्याची भरती केली जाऊ नये, अशी मागणी रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशनने निवेदनाद्वारे केली आहे.याबाबत फेडरेशनच्या वतीने नागेश गायकवाड, गणेश कदम, दीपक तेली यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पीएमपीमार्फत पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर व पीएमआरडीच्या हद्दीमध्ये प्रवाशांची वाहतूक व्यवस्था केली जाते.
रोज जवळपास १० ते १५ लाख लोकसंख्येला सुरक्षित प्रवाससेवा देण्याचे काम पीएमपीच्या माध्यमातून केले जाते. साधारणत: १० ते ११ हजार कर्मचारी असणाऱ्या संस्थेत खासगीकरणाचा घाट घातला जात आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने होऊ नये, अशी मागणी संघटनेकडून होत आहे.