पिंपरी : शहरात वाहन चोरीच्या घटना सुरूच आहेत. सहा दुचाकी चोरीचे प्रकार उघडकीस आले आहेत. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये बुधवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राजकुमार अग्नू जगताप (वय २५, रा. मोरे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. जगताप त्यांची दुचाकी १६ जुलैला पिंपरीतील यशवंत नगर येथे टाटा मोटर्स कंपनीच्या हंगामी कामगारांच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली.
राजेश गणपत पाटील (वय ४०, रा. पाटील नगर, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पाटील यांची दुचाकी देहू-आळंदी रोडवर चौधरी ढाब्यासमोर पाटील नगर, चिखली येथे लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. वाहन चोरीचा हा प्रकार २७ जुलैला सकाळी पावणे दहा ते दुपारी दीडच्या दरम्यान घडला.
उत्तम लहू खांडेकर (वय ३४, रा. ताम्हाणे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. खांडेकर यांनी त्यांची दुचाकी राहत्या घराच्या पार्किंग मध्ये लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. वाहन चोरीचा हा प्रकार मंगळवारी सायंकाळी पावणेसहा ते बुधवारी सकाळी पावणे नऊच्या दरम्यान घडला.
क्षितिज हिमांशू राच (वय २८, रा. वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. राच यांनी दुचाकी त्यांच्या राहत्या घरच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. वाहन चोरीचा हा प्रकार २७ जून ते ४ ऑगस्ट दरम्यान घडला.
अब्दुल्लाह फारुख सय्यद (वय ३३, रा. थॉमस कॉलनी देहूरोड) यांनी देऊ रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सय्यद यांनी दुचाकी देहूरोड येथे सुबान्नल्ला हॉटेल समोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. वाहन चोरीचा हा प्रकार बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला.
प्रतिक प्रकाश गावडे (वय २६, रा. कृष्णा कॉलनी, लक्ष्मी चौक, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गावडे यांनी पाच हजार रुपये किंमतीची दुचाकी राहत्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. वाहन चोरीचा हा प्रकार २१ ऑक्टोबर २०२० ते ४ ऑगस्ट २०२१ या कालावधीत घडला.