पिंपरी: कोरोना रुग्ण संख्या कमी होत असली तरी निर्बंध कायम आहेत. त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई होत आहे. अशाच प्रकारे शहरात रविवारी विनामास्क फिरणाऱ्या २५३ जणांवर पोलिसांनी कारवाई केली.
महाराष्ट्रासहित पुणे आणि पिंपरीत कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे. काही शहरात लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात येणार आहे. पण नागरिकांना राज्य शासनाकडून सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. पिंपरीत दरोरज विनामास्कची कारवाई होतच असते. परंतु शनिवार आणि रविवार नागरिक सुट्टी असल्याने शक्यतो घराबाहेर पडत नाहीत. परंतु कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर उलट चित्र दिसू लागले आहे. पिंपरीकरांना कोरोनाचे गांभीर्य नसून ते तर विकेंडलाही विनामास्क फिरण्याचे धाडस करू लागले आहेत. पोलिसांकडून सातत्याने सांगूनही नागरिकांमध्ये काहींच फरक पडत नसल्याने त्याना कारवाई कारवाई लागत आहे.
एमआयडीसी भोसरी (३९), भोसरी (११), पिंपरी (०२), चिंचवड (१०), निगडी (१७), आळंदी (१८), चाकण (०८), दिघी (०७), सांगवी (०८), वाकड (२१) हिंजवडी (१४), देहूरोड (२१), तळेगाव दाभाडे (२९), चिखली (१०), रावेत चौकी (१४), शिरगाव चौकी (२१), म्हाळुंगे चौकी (०३) या पोलीस ठाण्यांतर्गत पोलिसांनी रविवारी २५३ जणांवर विनामास्क प्रकरणी कारवाई केली.
वीकेंड लाॅकडाऊन रद्द करण्यात आला असला तरी, कठोर निर्बंध लागू आहेत. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच नियमांचे पालन करून प्रशासनाला सहाकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.