शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

Plastic Ban : प्लॅस्टिक बंदीबाबत नागरिकांत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 3:01 AM

प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी नागरिकांमध्ये योग्य प्रकारे जनजागृती होणे गरजेचे असते. मात्र, जनजागृतीपेक्षा कायद्याचा धाक दाखवीत अंमलबजावणीच्या सबबीखाली शासकीय यंत्रणेचा दंड

पिंपरी : प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी नागरिकांमध्ये योग्य प्रकारे जनजागृती होणे गरजेचे असते. मात्र, जनजागृतीपेक्षा कायद्याचा धाक दाखवीत अंमलबजावणीच्या सबबीखाली शासकीय यंत्रणेचा दंड आकारणीवर भर दिसून आला. नेमक्या कोणत्या प्लॅस्टिकच्या वस्तूंवर बंदी आहे, कोणत्या नाही, पर्याय काय, याबद्दल अनभिज्ञता असल्याने नागरिकांत संभ्रम दिसून आला. मात्र, महापालिका प्रशासनाने कारवाई करीत सुमारे ८० हजार रुपयांचा दंड वसूल केला.महापालिकेने प्लॅस्टिक बंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर प्लॅस्टिक जमा करण्यासाठी विभागवार केंद्रे सुरू केली. बाजारपेठेत प्लॅस्टिक जमा करण्यासाठी यंत्रणा उभारण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात मात्र प्लॅस्टिक बंदी सुरू झाली, तरी नेमकी अंमलबजावणी होऊ शकली नाही. प्लॅस्टिक पिशव्या,प्लॅस्टिक चमचे, काच, ग्लास, स्ट्रॉ, तसेच थर्माकोल ताट, ग्लास, वाट्या आणि उत्पादने साठविण्यासाठीची प्लॅस्टिक आवरणे, द्रव पदार्थ साठवणुकीसाठी वापरात येणारे प्लॅस्टिक, सजावटीच्या वस्तू या प्लॅस्टिक वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. औषधांचे वेष्टन, अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या, नर्सरीत वापरले जाणारे प्लॅस्टिक, टिफिन, डिस्पोजेबल बॅग, टीव्ही, फ्रिज यांसारख्या उत्पादनासाठी वापरले जाणारे थर्माकोल, बिस्कीट, वेफर अशा खाद्यपदार्थांच्या पुड्यांचे वेस्टन यास बंदी घातलेली नाही.स्वच्छता अभियानात ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरण कसे करावे, वेगवेगळ्या बकेटमध्ये कचरा जमा करावा. यासाठी महापालिकेने जनजागृतीवर लाखो रुपये खर्च केला. ध्वनिक्षेपक लावलेल्या रिक्षाच नव्हे, तर मोठे टेम्पो शहरातून फिरविले. एवढेच नव्हे, तर मिळकतकर वसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरासमोर बँडपथके नेण्याचा खर्च केला. प्लॅस्टिक बंदीबाबतचे अभियान राबविताना मात्र महापालिकेचा उत्साह दिसून येत नाही.प्लॅस्टिकबंदीचा नियम पहिल्यांदा मोडल्यास पाच हजार रुपये, दुसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन केल्यास दहा हजार आणि तिसºयांंदा २५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. शिवाय तीन महिने तुरुंगवासाच्या शिक्षेची कायद्यात तरतूद आहे. महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी आणि या मोहिमेत काम करणारे कर्मचारी आता दंडवसुलीसाठी सज्ज झाले आहेत.महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या पुढाकाराने शहरात विविध ठिकाणी प्लॅस्टिक बंदीची मोहीम राबवली. एकूण १६ आस्थापनांची पाहणी करून तेथील ११५ किलो प्लॅस्टिक जप्त केले. तसेच त्यांच्याकडून ८० हजारांची दंडवसुली करण्यात आली. महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी प्लॅस्टिक बंदीची मोहीम राबवण्यात आली.तीन महिन्यांत अडीच लाखांचा दंड वसूलपिंपरी : प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाची शनिवारपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. महापालिकेने त्यासाठी बंदीची मोहीम राबवली असून, शहरातील दुकाने, हॉटेलांची तपासणी करण्यात आली. मागील तीन महिन्यांत ५२ जणांविरोधात दंडात्मक कारवाई करून दोन लाख ५२ हजारांचा दंड वसूल केला आहे.प्लॅस्टिकबंदी आणि दंडात्मक कारवाईबाबतची माहिती अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली. प्लॅस्टिकच्या पिशव्या, चमचे, ग्लास, स्ट्रॉ, थर्माकोल ताट, ग्लास, वाट्या, उत्पादने साठविण्यासाठी असलेली प्लॅस्टिकची आवरणे, द्रवपदार्थ साठविण्यासाठी वापरण्यात येणारे प्लॅस्टिक, अन्नपदार्थ साठविण्यासाठी वापरले जाणारे प्लॅस्टिक, प्लॅस्टिक व थर्माकोल डेकोरेशन यावर बंदी घालण्यात आली आहे. २३ मार्च रोजी राज्य शासनाने प्लॅस्टिक बंदीची अधिसूचना जारी केली होती. त्यानंतर या वस्तूंचा साठा संपण्यासाठी २२ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती.अ क्षेत्रीय कार्यालय वगळता अन्य क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत अधिकाºयांनी बंदी असताना ज्यांच्याकडे प्लॅस्टिक आढळून आले, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.ब क्षेत्रीय कार्यालय हद्दीत चार दुकानांतील नऊ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. त्यांच्याकडून २० हजारांची दंडवसुली केली.क क्षेत्रीय कार्यालय हद्दीत चार दुकानदारांकडून ७.२ किलो प्लॅस्टिक साठा जप्त करून २० हजारांची दंडवसुली केली.ड क्षेत्रीय कार्यालय हद्दीत दोन दुकानदारांकडून ४५ किलो प्लॅस्टिक जप्त केले. त्यांच्याकडून १० हजार दंड वसूल केला.ई क्षेत्रीय कार्यालय हद्दीत चार किलो प्लॅस्टिक जप्त केले.फ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत चार किलो प्लॅस्टिक जप्त करून पाच हजारांचा दंड वसूल केला आहे.ग क्षेत्रीय कार्यालय हद्दीत २० किलो प्लॅस्टिक जप्त केले. तसेच १५ हजारांची दंडवसुली झाली.ह क्षेत्रीय कार्यालय हद्दीत २६ किलो प्लॅस्टिक जप्त करून १० हजारांचा दंड वसूल करण्यात आला.एकूण ११५.१ किलो प्लॅस्टिक जप्त करून महापालिकेने ८० हजारांचा दंड वसूल केला आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी