पिंपरी : महापालिकेच्या मुख्यालयासह शाळा, दवाखाने, रुग्णालयांमध्ये, महापालिकेच्या कार्यक्रमांमध्ये प्लास्टिकचा वापर करू नये, पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर न करता ग्लास अथवा धातूपासून निर्मित बाटल्यांचा वापर करावा. प्लास्टिकचा वापर होणार नाही, याची विभागप्रमुखांनी जबाबदारी घ्यावी. प्लास्टिकचा वापर आढळल्यास विभागप्रमुखांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे.महाराष्ट्र सरकारने २३ मार्च २०१८ पासून राज्यात प्लास्टिक बंदी केली आहे. महापालिका क्षेत्रात प्लॉस्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू आहे. तसेच आरोग्य विभागाच्या वतीने प्लॉस्टिकचा वापर करणारे व्यावसायिक आणि नागरिकांवरही कारवाई करण्यात येत आहे. महापालिकेने पथकही तयार केले आहे.मंत्र्यांनी घेतला आढावा, मे पर्यंत प्लॉस्टिक मुक्त शहरशिवसेना नेते, युवा सेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे प्लास्टिक बंदीचा आढावा घेतला. १ मे २०२० पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. त्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना आदित्य ठाकरे यांनी दिल्या आहेत. प्लास्टिक अविघटनशील असल्यामुळे राज्य सरकारने प्लास्टीक उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी आणि साठवणुकीवर २३ मार्च २०१८ रोजीच्या अधिसूचनेद्वारे बंदी घातली आहे. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेतही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी परिपत्रक जारी केले होते. पर्यावरण मंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरंसिंग झाल्यानंतर मिळालेल्या सूचनेनुसार आयुक्तांना पुन्हा परित्रक प्रसिद्ध केले आहे.महापालिकेकडूनही होणार अंमलबजावणीआयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ह्यह्यपिंपरी - चिंचवड महापालिका मुख्यालय, आठ क्षेत्रीय कार्यालये, विभागीय करसंकलन कार्यालये, सर्व शाळा, दवाखाने, रुग्णालये याशिवाय महापालिकेच्या सार्वजनिक कार्यक्रमांच्या आयोजनात प्लास्टिकचा वापर करण्यात येऊ नये. पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर न करता ग्लास अथवा धातूपासून निर्मित बाटल्यांचा वापर करण्यात यावा. प्लास्टिकचा वापर होणार नाही, याची विभागप्रमुखांनी जबाबदारी घ्यावी. विभागामध्ये कोठेही प्लास्टिकचा वापर आढळून आल्यास विभागप्रमुखांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.ह्णह्णमहापालिका क्षेत्रात शिक्षण समितीची मराठी माध्यमाची ८७, हिंदी माध्यमाची २, उर्दू माध्यमाची १४ आणि इंग्रजी माध्यमाच्या २ शाळा आहेत. तर २०८ बालवाड्या, तसेच प्राथमिक शळा ८७ आणि माध्यमिक विद्यालये १९ आहेत. महापालिका शाळांच्या परिसरात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी होणार आहे.
पिंपरी महापालिका, शाळा, रुग्णालयांमध्ये प्लास्टिकवर बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 6:36 PM
महाराष्ट्र सरकारने २३ मार्च २०१८ पासून केली आहे राज्यात प्लास्टिक बंदी
ठळक मुद्देप्लास्टिकचा वापर आढळल्यास विभागप्रमुख, अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई