शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

अ‍ॅपच्या ऑफरमधून नागरिकांची होतेय लूट; ‘बॅड लक, ट्राय नेक्स्ट टाइम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:45 AM

- मंगेश पांडे  पिंपरी : आमच्या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून आॅनलाइन व्यवहार करून लाखो रुपये जिंका, कूपन मिळवा बक्षिसे जिंका अशा ...

- मंगेश पांडे 

पिंपरी : आमच्या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून आॅनलाइन व्यवहार करून लाखो रुपये जिंका, कूपन मिळवा बक्षिसे जिंका अशा प्रकारच्या ऑफर रोजच मोबाइलवर धडकत असतात. मात्र, प्रत्यक्षात कसलेही बक्षीस मिळत नसल्याने ऑफरच्या केवळ अफवाच ठरत असल्याचे दिसून येत आहे.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध कंपन्यांकडून वेगवेगळ्या ऑफर दिल्या जातात. मात्र, या ऑफर अनेकदा अफवा ठरत असून, यातून नागरिकांची फसवणूकही होत असल्याचे समोर येत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फंडे लढविले जात असून, यामध्ये नागरिकही गुरफटले जातात. मात्र, यातून आपली फसवणूक होत असल्याबाबत नागरिक अनभिज्ञ असतात. या माध्यमातून आर्थिक फटका बसल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येते.

असाच प्रकार निगडीतील एका व्यक्तीबाबत घडला. त्या व्यक्तीने एक अ‍ॅप्लिकेशन मोबाइलमध्ये डाउनलोड केले. त्यामधून एका कंपनीने आॅनलाइन व्यवहार करण्यास सांगत या अ‍ॅप्लिकेशनद्वारे व्यवहार केल्यास बक्षीस मिळेल, असे आमिष दाखविले. त्यामुळे त्या व्यक्तीने हजार रुपयांची खरेदी करीत संबंधित कंपनीच्या अ‍ॅपद्वारे पैसे जमा केले. त्यानंतर काही दिवसांनी एक लाख रुपयांचे कूपन लागले असल्याचे सांगण्यात आले. मात्र, ठरावीक दिवशी कूपन स्क्रॅच केले असता, बक्षीस लागले नाही.

अनेक वेळा असे व्यवहार करताना अकाउंटमधून परस्पर पैशांची कपात होते. पण व्यवहार रद्द केल्यास संबंधिताला पैसे आॅनलाइन परत मिळत नाहीत. पैसे परत मिळविण्यासाठी बँकेत प्रत्यक्ष जावे लागते आणि आॅफलाइनच व्यवहार करावा लागतो.पदरी पडते निराशा : कुपन स्क्रॅच करून हाती काहीच नाहीसध्या आॅनलाइन व्यवहाराला प्राधान्य देण्याच्या नावाखाली सर्रासपणे ग्राहकांची फसवणूक केली जाते. ग्राहकाकडे उपलब्ध डेबिट कार्डद्वारे देखील आॅनलाइन खरेदी केली जाऊ शकते. मात्र, वेगवेगळ्या कंपन्यांनी तयार केलेल्या अ‍ॅपच्या माध्यमातून आॅनलाइन रक्कम जमा केल्यास विविध आॅफर दिल्या जात आहेत.अमुक एका अ‍ॅपच्या माध्यमातून पैसे जमा केल्यास तुम्हाला ठरावीक दिवसांत कूपनच्या माध्यमातून अमुक रकमेचे बक्षीस मिळेल, असे सांगितले जाते. मात्र, ठरवून दिलेल्या दिवशी कूपन स्क्रॅच केल्यास काहीही हाती लागत नाही. केवळ ‘बॅड लक, ट्राय नेक्स्ट टाइम’ असा मेसेज येतो. त्यामुळे ग्राहकाच्या पदरी निराशा पडते.आमिषाला पडतात बळीग्राहकाला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या आॅफर दिल्या जातात. विविध प्रकारची बक्षिसे असल्याचे सांगितले जाते. आमिषाला बळी पडत ग्राहक संबंधित कंपनी सूचना देईल त्याप्रमाणे मोबाइलवरून आॅनलाइन व्यवहाराची प्रक्रिया करीत राहतात. मात्र, प्रत्यक्षात हाती काहीच पडत नाही. एका अ‍ॅपद्वारे खरेदी करा; ९० टक्के सवलत आहे असा मेसेज सध्या फिरत आहे. हा मेसेज दहा जणांना पाठविल्यानंतर तुम्हाला आकर्षक वस्तू मिळेल, असे सांगण्यात येते. पण दहा जणांना मेसेज करून ग्राहकांना काहीही मिळत नसल्याने एकप्रकारे ग्राहकराजाची केवळ फसवणूकच होते.खात्याची माहितीअ‍ॅप डाऊनलोड करताना बँक खात्यासह डेबिट कार्डची माहिती भरली जाते. दरम्यान, संबंधित कंपनीकडे त्या व्यक्तीच्या बॅँक खात्याची माहिती राहत असल्याने धोका पोहोचू शकतो.

टॅग्स :googleगुगल