पुणे : वातानुकूलित बसचे दर कमी करण्याच्या पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) च्या प्रस्तावाला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या बसचे दर ३० ते ७० रुपयांनी कमी झाले आहेत. प्रवाशांअभावी तोट्यात चाललेल्या या बससेवेला आता तरी प्रवासी मिळतील, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे.
‘पीएमपी’कडून सध्या तीन मार्गांवर वातानुकूलित बससेवा सुरू आहे. मात्र, या बसेसचे तिकीटदर जास्त असल्याने प्रवाशांकडून अत्यंत कमी प्रतिसाद मिळतो. त्यामुळे सध्या ही सेवा तोट्यात चालली आहे. या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने या बससेवेच तिकीटदर कमी करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबतचा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. प्राधिकरणाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे हिंजवडी ते विमानतळ बससेवेचे तिकीटदर ७० रुपयांनी कमी होऊन ११० रुपये केले आहेत.नवीन तिकीट दर (कंसात जुने दर)हिंजवडी ते एअरपोर्ट - ११० (१८०)निगडी ते कात्रज - ७० (१००)हडपसर ते निगडी - ७० (१००)