शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

पीएमआरडीएतर्फे सोमवारपासून पुन्हा ‘हातोडा’; २५०० पेक्षा अधिक अतिक्रमणांवर कारवाई

By नारायण बडगुजर | Updated: March 15, 2025 18:48 IST

वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी अनधिकृतपणे उभारलेल्या बांधकामांवर धडक कारवाई करत ते जमीनदोस्त करण्यात येत आहेत.

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश‍ विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या अनुषंगाने संयुक्तपणे विशेष मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यातील अतिक्रमणविरुद्ध मोहीम यशस्वी होत असून आता दुसऱ्या टप्प्याची आखणी १७ ते ३० मार्चदरम्यान करण्यात आली आहे. वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी अनधिकृतपणे उभारलेल्या बांधकामांवर धडक कारवाई करत ते जमीनदोस्त करण्यात येत आहेत.

पहिल्या टप्प्यात पीएमआरडीएच्या संयुक्त कारवाईमध्ये पुणे शहर पोलिस, पिंपरी-चिंचवड पोलीस, पुणे ग्रामीण पोलिस, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी, एमआयडीसी, महावितरण आदी विभागांमार्फत ३ ते १३ दरम्यान २५०० पेक्षा अधिक अतिक्रमणांवर कारवाई केली. यासह अनेक स्थानिकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढून घेतली. 

महामार्ग व राज्यमार्ग रस्त्यालगत असणाऱ्या दुकाने, पत्राशेड, गाळे, टपरी व अनधिकृत बांधकामे काढण्यात आली आहेत. पुढील टप्प्यामध्ये संयुक्त कारवाई ही पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे महामार्ग व रस्त्यांवर होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अतिक्रमण कारवाई १७ ते ३० मार्च २०२५ पर्यंत चालणार आहे. त्यामुळे पीएमआरडीए, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रस्त्यांवरील अतिक्रमण धारकांनी स्वत: अतिक्रमणे काढून घेत प्रशासनास सहकार्य करावे, यासह कोणतेही बांधकाम पूर्वपरवानगी घेऊनच करावेत, असे आवाहन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.

१७ ते ३० मार्च दरम्यान होणारी कारवाई 

-पुणे–सातारा रस्ता (नवले पूल ते सारोळे).-सुस रस्ता.-हडपसर (शेवाळवाडी) ते दिवे घाट.-नवलाख उंब्रे ते चाकण.-हिंजवडी परिसर – माण.-तळेगाव – चाकण – शिक्रापूर.

३ ते १३ मार्च दरम्यान झालेली कारवाई

-पुणे–नाशिक महामार्गावरील चिंबळी (बर्गेवस्ती) ते सांडभोरवाडीपर्यंत २९ किलोमीटर परिसरात ८९८ अतिक्रमण व अनधिकृत बांधकामे पाडली. त्याचे क्षेत्रफळ ८९८०० चौरस फूट आहे.-पुणे-सोलापूर रस्त्याच्या दुतर्फा ३३ किलोमीटर परिसरात १०४७ स्ट्रक्चर्सवर कारवाई केली. त्याचे क्षेत्रफळ १०४७०० चौरस फूट आहे.-चांदणी चौक ते पौड रस्त्याच्या बाजूस २१ किलोमीटर परिसरात ५५७ स्ट्रक्चर्सवरील कारवाई क्षेत्रफळ ५५७०० चौरस फूट आहे.

टॅग्स :PuneपुणेPMRDAपीएमआरडीएMuncipal Corporationनगर पालिकाSocialसामाजिकcommissionerआयुक्तHomeसुंदर गृहनियोजन