पुणे: पिंपरी शहर व परिसरात शाळा व महाविद्यालयाबाहेर विनाकारण थांबत टवाळखोरी करणाऱ्यांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये ३५ मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या ताब्यात घेतलेल्या सर्व टवाळखोरांना त्यांच्या नातेवाईंकांसमोर समज देत सोडून दिले. अलिकडच्या काळात शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात रोडरोमिओंकडून मुलींच्या छेडछाडीचे विविध प्रकार घडत असल्याने पोलिसांकडून ही मोहीम उघडण्यात आली आहे. पिंपरी परिसरातील ताब्यात घेतलेल्यांसह इतर बेशिस्त ३३ वाहनांची यादी पिंपरी वाहतूक नियमन विभागाकडे कारवाईसाठी पाठविण्यात आली आहे. प्रतिभा कॉलेज, जय हिंद कॉलेज, संत तुकाराम नगर या भागात ही कारवाई करण्यात आली. तसेच या कारवाईनंतर शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसोबत पोलीस अधिकाऱ्यांनी संवाद साधत कुणा टवाळखोरांकडून त्रास होत असेल तर पोलिसांकडे तत्काळ तक्रार करण्याचे आवाहन केले. शहरात मुलींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी ही कारवाईची मोहीम यापुढे अधिक कडक पध्दतीने राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.
पिंपरीत शाळा व महाविद्यालयांबाहेरील टवाळखोरांवर पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 6:21 PM
अलिकडच्या काळात शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात रोडरोमिओंकडून मुलींच्या छेडछाडीचे विविध प्रकार घडत असल्याने पोलिसांकडून ही मोहीम उघडण्यात आली आहे.
ठळक मुद्देताब्यात घेतलेल्यांसह इतर बेशिस्त ३३ वाहनांची यादी कारवाईसाठी पिंपरी वाहतूक नियमन विभागाकडेटवाळखोरांकडून त्रास होत असेल तर पोलिसांकडे तत्काळ तक्रार करण्याचे आवाहन