शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

Pimpri-Chinchwad: शहरात डंपर, मिक्सरच्या बेशिस्त चालकांवर ‘बडगा’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 6:04 PM

वाहतूक सुरळीत करण्यासाठी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे

पिंपरी : शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई होत आहे. नियमांचे उल्लंघन करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या डंपर व मिक्सर, अशा ३७२ वाहनांवर कारवाई केली. त्यात तीन लाखांवर दंड आकारण्यात आला. विशेष मोहीमेंतर्गत सोमवारी (दि. २०) ही कारवाई करण्यात आली.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. त्यात पोलिसांकडून शहरातील मुख्य रस्ते व चौकांत वाहतूक नियमन केले जात आहे. तसेच वाहनांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे दंड वसुली देखील होत आहे. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर ई-चलानच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई होत आहे. अवजड वाहने शहरात गर्दीच्या वेळेत भरधाव तसेच बेशिस्तपणे चालवून वाहतुकीला अडथळा निर्माण केला जातो. तसेच अपघातही होतात.  या प्रकारांना आळा बसावा म्हणून पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून डंपर व मिक्सर यासारख्या अवजड वाहनांच्या बेशिस्त चालकांवर कारवाई केली जात आहे. 

वाहन तपासणीसाठी विशेष मोहीमविशेष मोहीम राबवून वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यात वाहनचालकांचे लायसन्स, वाहनाचे कागदपत्र यांची पाहणी केली जात आहे. तसेच नो पार्किंगमध्ये वाहन पार्क करणे, दादा, मामा असे लिहून नंबरप्लेटमध्ये बदल करणे, रिफ्लेक्टर सुस्थितीत नसणे, अशा डंपर व मिक्सरवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. 

वाहतूक पोलिसांनी सोमवारी केलेली कारवाईवाहन - केसेस - दंड (रुपये)डंपर - २९० - २,३६,२७०मिक्सर - ८२ - ७१,८००

वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन अपघात टाळणे शक्य होणार आहे. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच वाहनांची तपासणी करून दंड वसुलीवर भर देण्यात येणार आहे. - आनंद भोईटे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड 

टॅग्स :Puneपुणेharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडElectionनिवडणूक