पिंपरी चिंचवड : पाेलीस अधिकाऱ्याच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समाेर आली आहे. पिंपरीतील माेरवाडी भागात ही घटना घडली आहे. अभिषेक दळवी ( वय 29 ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याचे वडील हे सांगली जिल्ह्यात पाेलीस निरीक्षक पदावर काम करीत आहेत. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेक त्याची पत्नी आणि त्याची आई हे माेरवाडी परिसरात राहतात. अभिषेकचे वडील हे नाेकरीसाठी सांगली जिल्ह्यात असतात. एकाच वर्षापूर्वी अभिषेकचे लग्न झाले हाेते. काल मध्यरात्री अभिषेकने मद्यपान केले हाेते. त्यानंतर त्याने बेडरुमध्ये जाऊन दरवाजा आतून लावून घेत गळफास घेतला. त्याच्या पत्नीने तसेच आईने विनवण्याकरुनही अभिषेकने दरवाजा उघडला नाही. शेजारी राहणाऱ्या अभिषेकच्या चुलत भावाला बाेलवल्यावर त्याने पाेलीस आणि अग्निशमन दलाला संपर्क केला. अग्निशमन दलाच्या जवानांनी दरवाजा ताेडला असता अभिषेकने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समाेर आले. अभिषेकने आत्महत्या का केली याबाबत समजू शकले नाही. पुढील तपास पिंपरी पाेलीस करीत आहेत.