शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

‘थर्टी फर्स्ट’च्या निमित्ताने पोलीस यंत्रणा सज्ज  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 4:06 AM

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेलांमध्ये थर्टी फर्स्टच्या पार्ट्या, कार्यक़्रमांचे आयोजन केले जाते. या कालावधित कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. एकूण ३७५ पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

पिंपरी : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेलांमध्ये थर्टी फर्स्टच्या पार्ट्या, कार्यक़्रमांचे आयोजन केले जाते. या कालावधित कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. एकूण ३७५ पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. अशी माहिती परिमंडल तीनचे सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांनी दिली.वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त राजेंद्र भामरे म्हणाले, वाहतूक शाखेनेही थर्टी फर्स्टच्या निमित्ताने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये १६ तपासणी नाके निश्चित करण्यात आले आहेत. शहरात प्रवेश करण्याच्या आणि शहराबाहेर पडण्याच्या मार्गावर प्रमुख ठिकाणी हे तपासणी नाके आहेत. ७ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि ७२ वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी सज्ज ठेवले आहेत. बॅरिकेटस लावून वाहनांची, वाहनचालकांची तपासणी केली जाणार आहे. नाकाबंदी केलेल्या ठिकाणी ब्रिथ अनॅलायझरच्या साह्याने वाहनचालक मद्याच्या अंमलाखाली आहे की नाही हे तपासले जाणार आहेत. दुचाकी, चारचाकी वाहनचालकांची तपासणी केली जाणार आहे.राज्याच्या गृहखात्याने दिलेल्या आदेशानुसार, हॉटेलचालकांना नियमित वेळेपेक्षा अधिक वेळ हॉटेल सुरू ठेवण्यास तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून थर्टी फर्स्ट सेलिबे्रेशनसाठी हॉटेल व्यावसायिकांनी परवाने घेतले आहेत. पहाटे पाचपर्यंत हॉटेलमध्ये कार्यक़्रम घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मद्यपींसाठी एक दिवसाचा परवाना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.देशी मद्यासाठी प्रति व्यक्ती २ रुपये असे एक दिवसाचे शुल्क आकारण्यात येत आहे. विदेशी मद्य घेणाºयांसाठी प्रत्येकी पाच रुपये शुल्क घेतले जात आहे. देशी मद्यासाठी १२००० तर परदेशी मद्यासाठी २५००० असेएकूण ३७ हजार परवाने पिंपरी चिंचवडमध्ये वितरित करण्यात आले आहेत. एफएल २, एफएलबीआर २, सीएल ३ या प्रकारातील परवाने हॉटेलचालकांनी नूतनीकरण करून घेतले आहेत, अशी माहितीउत्पादन शुल्क पिंपरी विभागाच्या अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :Policeपोलिसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड