पिंपरी : पुणे मुबंई महामार्गावरील आकुर्डी येथील बजाज कंपनी आवारात आज सकाळी १० ला पद्मभूषण राहुल बजाज यांचे पार्थिव आणण्यात आले. त्यावेळी उद्योग, कामगार, राजकीय आणि सामाजिक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.
आकुर्डीत बजाज यांचे निवासस्थान आहे. पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयातुन बजाज यांचे पार्थिव सकाळी निवासस्थानी आणण्यात आले. सुरवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बजाज यांचे दर्शन घेतले. त्यानंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आदरांजली वाहिली. त्यानंतर साडेअकरा वाजता सांस्कृतिक भवन प्रागण येथे पार्थिव नेण्यात आले. तिथे पोलीस पथकाच्या वतीने दुपारी बारा वाजता मानवंदना देणात आली. त्यानंतर दर्शन सुरू करण्यात आले. भर उन्हातही मोठ्या प्रमाणावर कामगार आले होते.
डॉ रघुनाथ माशेलकर, लीला पुनवाला, प्रतापराव पवार, बजाज यांचे भाऊ मधुर बजाज, शेखर बजाज, शशिर बजाज, नीरज बजाज, मुलगा राजीव बजाज, संजीव बजाज, मुलगी सूनयना केजरीवाल,बहीण सुमन जैन उपस्थित होते. यावेळी तहसीलदार गीता गायकवाड, खासदार श्रीरंग बारणे, महापौर उषा ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके यांनी आदरांजली वाहिली.