शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांची छापेमारी; सहा ठिकाणी कारवाई, तीन आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 5:47 PM

पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली

पिंपरी : अवैध दारु विक्री प्रकरणी पिंपरी-चिंचवडपोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली. चाकण, दिघी आणि पिंपरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक तर हिंजवडी पोलीस ठाण्यात तीन असे एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आले. यात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली.

चाकण पोलिसांनी नाणेकरवाडी गावाच्या हद्दीत रविवारी (दि. २९) सायंकाळी साडेसातच्या सुमारास कारवाई केली. यात श्रीकांत राजेंद्र कोळी (वय २५, रा. नाणेकरवाडी) याला अटक केली. आरोपीने दोन हजार ७०० रुपयांची देशी दारु विनापरवाना बाळगून चोरून विक्री करताना पोलिसांना मिळून आला. 

दिघी पोलिसांनी आळंदी देवाची येथे इंद्रायणी नदीच्या घाटावर रविवारी (दि. २९) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास कारवाई केली. राजकुमार छत्रपाल यादव (वय १९), व्यंकटेश माधवराव मठपती (वय २०, दोघेही रा. आळंदी देवाची) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. व्यंकटेश मठपती याच्या सांगण्यावरून राजकुमार यादव याने विक्रीसाठी चार हजार ३२० रुपये किमतीच्या देशी दारुच्या बाटल्या बाळगल्या. कारवाई करून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

पिंपरी पोलिसांनी रविवारी विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी येथे कारवाई केली. उजनवती संपत सुरवसे (वय ४८, रा. विठ्ठलनगर) आणि सोन्या (वय २७, रा. भाटनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. उजनवती सुरवसे ही महिला ५२० रुपये किमतीची पाच लिटर गावठी हातभट्टीची दारू विक्री करताना मिळून आली. आरोपी सोन्या याने विक्रीसाठी महिलेला दारू आणून दिली.  अमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी (दि. २८) पुनावळे येथे कारवाई केली. विनापरवाना विक्रीसाठी दोन हजार १०० रुपयांची दारू बेकायदेशीरपणे त्याच्या ताब्यात बाळगल्याप्रकरणी सुधीर कमल मंडल (वय ३५, रा. पुनावळे) याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. हिंजवडी पोलिसांनी रविवारी हिंजवडी येथे कारवाई करून अजय लालूराम कर्मावत (वय २०, रा. हिंजवडी) याला अटक केली. त्याच्यासह समाधान महादेवराव दोडके (वय ३७, रा. म्हाळुंगेगाव, ता. मुळशी) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

हिंजवडी पोलिसांनी दुसरी कारवाई माण येथे केली. संतोष परशुराम राठोड (वय ४३, रा. भोईरवाडी, ता. मुळशी) याला अटक करून त्याच्यासह भगवान भाऊसाहेब भोईर (वय ६८, रा. भोईरवाडी, ता. मुळशी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी