पिंपरी : वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या तीन लाॅजवर पोलिसांनी छापा टाकला. काही तरुणींची सुटका करून आठ जणांना याप्रकरणी अटक केली. भोसरी पोलिसांनी मंगळवारी (दि. ८) ही कारवाई केली.
धावडे वस्ती भोसरी येथील साईराज लॉजवर छापा टाकून टाकून पोलिसांनी याप्रकरणी प्रशांत जीवा शेट्टी (वय ४५), चेतन राजू पुजारी (वय ३२), प्रशांत मेलगिरी (तिघे रा. धावडे वस्ती, भोसरी), प्रकाश शेट्टी (रा. हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यातील प्रशांत आणि चेतन या दोन आरोपींना अटक केली. आरोपी प्रकाश शेट्टी हा लॉजचा मालक आहे. तो लॉजमध्ये वेश्या व्यवसाय करून घेत होता.
शास्त्री चौक, आळंदी रोड, भोसरी येथील सूर्या हॉटेल अँड लॉज येथे कारवाई करून पोलिसांनी प्रशांत मुरलीधर फाळके (वय ४०), ज्ञानेश्वर श्रीराम फाळके (वय ४३, दोघेही रा. भोसरी, मूळ रा. वाडी, ता. नांदुरा, जि. बुलढाणा), परमेश्वर रावसाहेब इंगळे (वय ४३, रा. भोसरी, मूळ रा. सरवडी, ता. निलंगा, जि. लातूर) या तिघांना अटक केली आहे. हे आरोपी वेश्या व्यवसायासाठी ग्राहक आणून तरुणींकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत होते.
शास्त्री चौकातील वनराज हॉटेल बार रेस्टोरंट व लॉजिंग येथे कारवाई करून पोलिसांनी विश्वनाथ भोजा शेट्टी (वय ५६, रा. भोसरी), सीताराम रामण्णा शेट्टी (वय ५०, रा. पिंपरीगाव), कुबेर फकीरप्पा पात्रोट (वय ४८, रा. भोसरी) या तिघांना अटक केली. तिन्ही आरोपी महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते.