नारायण बडगुजर- पिंपरी : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे प्रत्येक घटकावर आर्थिक संकट ओढावले. असे असतानाही पोलिसांनी लाचखोरी करून वसुली सुरूच ठेवली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अशा पोलिसांवर सापळा रचून कारवाई केली. यात गेल्यावर्षापासून ऑगस्ट २०२१ पर्यंत सहा अधिकारी व दोन कर्मचारी जाळ्यात सापडले.
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीतील लाचखाेरी प्रकरण सध्या चर्चेत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत पोलीस सर्वाधिक भ्रष्ट असल्याचे दिसून येते. गेल्या वर्षीपासून कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे सामान्य नागरिक आर्थिक विवंचनेत आहेत. अशा नागरिकांना ‘नाडण्या’चा उद्योग काही पोलिसांनी केला. समाजाच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलिसांनीच सामान्यांचे आर्थिक शोषण केल्याचे यावरून समोर आले आहे.
अडीच हजारापासून पाच लाखांपर्यंत स्वीकारलेवाहतूक पोलिसांच्या हप्त्यासाठी पैशांची मागणीवाहन चालविण्यासाठी वाकड-हिंजवडी वाहतूक पोलिसांना हप्ता द्यावा लागतो, असे सांगून एका खासगी व्यक्तीने दोन महिन्यांचा हप्ता म्हणून दोन हजार ६०० रुपयांची मागणी केली. तसेच ती रक्कम लाच स्वरुपात स्वीकारली. हिंजवडी येथे १३ फेब्रुवारी २०१९ रोजी सापळा रचून कारवाई केली. पोलीस असल्याचे भासवून घेतली लाचदोन जणांनी पोलीस असल्याचे भासवले. गुन्हे शाखेच्या युनिटकडे तक्रार दाखल असून, ती केस बंद होण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी खासगी व्यक्तींनी लाचेची मागणी केली. त्यात ३२ हजार रुपये रोख व ७४ हजारांचा धनादेश, असे एकूण एक लाख सहा हजारांची लाच स्वीकारली. चिखली येथे १७ एप्रिल २०१९ रोजी सापळा रचून कारवाई केली.
लोचखोराने अधिकाऱ्याच्या अंगावर घातली गाडीचाकण पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क वर्गीकरण करण्यासाठी सात लाखांची मागणी केली. त्यातील पहिला हप्ता म्हणून तीन लाख रुपये स्वीकारले. म्हाळुंगे पोलीस चौकीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांच्यासह दोघे ही लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हा सापळा रचला होता. ही कारवाई २९ सप्टेंबर २०१९ रोजी केली. सापळ्यात अडकलेले पोलीसवर्ष - २०१९ - २०२० - २०२१अधिकारी - १ - ६ - कर्मचारी - ६ - १- १